Sunday, April 27, 2025
Homeमहाराष्ट्रRaj Thackeray : "बेडरुमच्या मधोमध पलंग अन्..."; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 'तो'...

Raj Thackeray : “बेडरुमच्या मधोमध पलंग अन्…”; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ‘तो’ किस्सा सांगताच पिकला हशा

पुणे | Pune

मनसे अध्यक्ष (MNS President) राज ठाकरे (Raj Thackeray) हे आज पुणे (Pune) दौऱ्यावर असून त्यांची जागतिक आर्किटेक दिनानिमित्त, शहर नियोजन सौंदर्यदृष्टी आणि शाश्वत विकास यावर आज प्रकट मुलाखत झाली. ज्येष्ठ लेखक, नाट्य चित्रपट कलाकार दीपक करंजीकर यांनी ही मुलाखत घेतली असून राज ठाकरेंनी मुलाखतीत (interview) शहरांच्या विद्रुपीकरणासह विविध विषयांवर भाष्य करत तुफान फटकेबाजी केली आहे…

- Advertisement -

यावेळी बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, “शहरे सुंदर दिसण्यासाठी मुळात सौंदर्यदृष्टी सत्तेत असायला पाहिजे, तरच ती खाली उतरते. नाहीतर तुम्ही खाली कितीही टाहो फोडा, त्याचा काहीही उपयोग नाही. महापालिकेत टाऊन प्लॅनिंगमध्ये इंजिनिअरला महत्व आहे पण आर्किटेक्टला (Architect) नाही. आपल्याकडे सौंदर्यदृष्टीचा अभाव आहे त्याकडे राज्यकर्त्यांचे लक्ष नाही. आपल्याकडे रस्ते (Road) बांधले जातात पण कोणत्या प्रकारचे रस्ते बांधायला हवेत याचा विचार केला जात नाही. फक्त आहेत पैसे (Money) म्हणून रस्ते बांधले जातात”, असे ठाकरे यांनी म्हटले.

Gaganyaan Mission Test : इस्रोचे मोठे यश! ‘गगनयान’ अवकाशात यशस्वीपणे झेपावलं

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “मी एका चांगल्या शहरात जगतो आहे असे जर मला वाटले तर त्या जगण्याला अर्थ आहे. कारण तुम्ही रस्त्याने जात असताना खड्ड्यात (Pit) पाय पडतो, आणखी काय काय होतं. त्याला काय अर्थ आहे याला जगायचे म्हणून जगतोय असे वाटते. लोक परदेशात का जातात? तर त्यांना या चांगल्या सुविधा मिळतात म्हणून जातात. गाडगेबाबांच्या राज्यात आपल्याला लोकांना स्वच्छता शिकवावी लागते. तसेच पुणे आता कुठे राहिले आहे. हिंजवडीचे पुणे वेगळं, विमानगरचे वेगळं याचं कारण म्हणजे राज्यकर्त्यांचे शहरांकडे लक्षच नाही”, असेही राज ठाकरेंनी सांगितले.

ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा : शॉर्ट्स, रील्स, पोस्टर्सने वेधले मतदारांचे लक्ष

दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी बीडमधील (Beed) सर्किट हाऊसचा किस्सा देखील सांगितला. ते म्हणाले की, “बीड येथील सर्किट हाऊसमध्ये गेलो होतो. तेव्हा तिथल्या बेडरुमध्ये गेलो. बेडरुमचा मोठा हॉल होता आणि मधोमध पलंग. समजा नवविवाहित दाम्पत्य या बेडरुममध्ये गेलं तर पकडापकडी खेळणार का? मध्ये पलंग ठेवणार का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित करताच एकच हशा पिकला. याशिवाय महाराष्ट्रातील सर्किट हाऊस बघितली तर मोठं मोठी बाथरुमं असतात, तिथे पळत पळत आंघोळ करायची का?” असा टोला देखील राज ठाकरे यांनी लगावला.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Winter Session 2023 : राज्याचं हिवाळी अधिवेशन १० दिवसात गुंडाळणार? तात्पुरतं वेळापत्रक जाहीर

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...