नाशिक । प्रतिनिधी Nashik
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सोमवारपासून (दि.२६) दोन दिवस दौऱ्यावर येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मार्ग मोकळा केल्याने तसेच आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून त्या दौऱ्यात पक्ष संघटनेसह पदाधिकाऱ्यांची चर्चा करून कानमंत्रण देणार आहे. यापूर्वी दोन वेळा त्यांचा दौरा रद्द झाला होता.
सोमवारी सकाळी ९.३० वाजता त्यांचे हाॅटेल एसएसके येथे आगमन होईल. त्यानंतर ते शहरातील स्थानिक नेते व पदाधिकार्यांशी चर्चा करतील ही चर्चा वन टू वन होणार आहे. त्यात प्रामुख्याने केलेली आंदोलने याचा आढावा घेतील. येत्या दिवाळी अथवा पुढील वर्षात महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. ते पाहता हा मुद्दा केंद्रस्थानी राहील. पक्ष संघटनेत बदलही होऊ शकतात. दुसर्या दिवशी मंगळवारी (दि.२६) ते ग्रामीण पदाधिकार्यांशी संवाद साधतील व जिल्हा परिषद निवडणुकांबाबत पक्षाची रणनितीबाबत चर्चा करतील असे समजते.