नाशिक । प्रतिनिधी Nashik
- Advertisement -
आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सोमवार (दि.19) पासून दोन दिवसांच्या नाशिक दौर्यावर येणार होते. मात्र, त्यांचा दौरा पुन्हा रद्द झाला आहे.
यापूर्वी ते 15 व 16 मे रोजी नाशिक दौर्यावर येणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला होता, तर राज ठाकरे 19 मे पासून नाशिकच्या दौर्यावर येणार असल्याचे मनसेच्या पदाधिकार्यांनी सांगितले होते. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार होते. निवडणुका चार महिन्यांत घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज ठाकरे यांच्या दौर्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.