Tuesday, October 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray : महाराष्ट्राची सर्कस झाली आहे, कोणी विदुषकी चाळे करत आहे…;...

Raj Thackeray : महाराष्ट्राची सर्कस झाली आहे, कोणी विदुषकी चाळे करत आहे…; राज ठाकरेंचा नाव न घेता नेत्यांना टोला

पुणे | Pune
महाराष्ट्राचा सगळा खेळ झाला आहे. कोणी विदुषक चाळे करताय, कोण मंत्रालयाच्या जाळ्यावर उड्या मारताय अशी टीका राज ठाकरेंनी पुण्यात बोलताना केली. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण संपन्न झाले. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी राजकीय नेत्यांवर बोचरी टीका केली.

काय म्हणाले राज ठाकरे?
महाराष्ट्राची सर्कस झाली आहे, कोणी विदुषकी चाळे करत आहे, कुणी मंत्रालयाच्या जाळ्यांवरून उड्या मारत आहेत. राजकारण्यांची भाषा खाली गेली आहे, खालच्या थराला जाऊन लोक बोलत आहेत, त्यांना समजावणारे कोणी नाही. ज्यांना बुजुर्ग म्हणावे तेच त्यांच्या आहारी लागले आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र नविनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टोला लगावला. साहित्यिकांनी सामाजिक चळवळ उभी करावी. साहित्यिकांनी राजकारण्यांना खडेबोल सुनावले पाहिजेत, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

- Advertisement -

ज्या तरुणांना राजकारणात यावे वाटतेय त्यांना वाटतेय की ही भाषा म्हणजे राजकारण आहे. महाराष्ट्राचे सगळ्यात जास्त अध:पतन होण्याचे श्रेय कोणाचा असेल तर ते माध्यमांचा आहे. लोक वाटेल ते बोलतात ते हे दाखवतात. जेव्हा हे दाखवणे बंद करतील तेव्हा हे बंद होईल, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

तसेच आम्ही बोललं ट्रोल होते असे तुम्हाला वाटते परंतु ट्रोलींगचा विचार करू नका. मी आजपर्यंत अनेक भाषणे दिली आहे, जे बोलायचे ते बोललो आहे परंतु सोशल मीडियात ज्या गोष्टी येतात त्या मी वाचायला जात नाही. त्या भानगडीत जात नाही. माझे बोलून झालेय ना, मग विषय संपला. कुठल्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायला मी जात नाही. जे तुमच्यावर प्रेम करतात ते स्पष्टीकरण मागत नाही आणि जे तुमचा द्वेष करतायेत ते तुमचे स्पष्टीकरण ऐकत नाही. साहित्यिकांनी ही भूमिका घेतली पाहिजे.

या कार्यक्रमात राज ठाकरे म्हणाले की, माझ्या आयुष्यातील सर्वात छोटं भाषण मी आज करणार आहे. साहित्यिकांसमोर आपण काय बोलणार, ज्यांची भाषा ऐकून आम्ही पुढे जातो, त्यांच्यासमोर बोलायचे नसते तर ऐकायचे असते. एवढी उज्ज्वल परंपरा साहित्यिकांशी आहे. महाराष्ट्राचे वेगळेपण इतर राज्यांपेक्षा काय हे इथे दिसून येते. मराठी साहित्य वाढवण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल, मदत लागेल त्यावेळी आम्ही आहोत. महाराष्ट्रातले साहित्यिक गेले अनेक वर्ष मी पाहत आलोय. मराठीबाणा प्रत्येकाच्या मनात अंगात रुजलेला असायचा. योग्यवेळी राजकारण्यांना जे ठणकावून सांगणे ही धमक, हिंमत जी काही वर्षापूर्वी होती ती आज कुठे तरी कमी दिसतेय असे वाटते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या