Friday, September 20, 2024
Homeराजकीयमनसेचे विधानसभेसाठी दोन उमदेवार जाहीर, राज ठाकरेंची घोषणा

मनसेचे विधानसभेसाठी दोन उमदेवार जाहीर, राज ठाकरेंची घोषणा

सोलापूर । Solapur

- Advertisement -

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election 2024) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे अॅक्शन मोडवर आले आहेत.

येत्या विधानसभा निवडणुकीत मनसे २२५ ते २५० जागा लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली होती. त्यानंतर आता मनसेने दोन उमेदवारांची घोषणा केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सोलापूर (Solapur News) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी राज ठाकरे यांनी मनसेचे विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवार जाहीर केले आहे.

बाळा नांदगांवकर यांना शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) हे मनसेचे माजी आमदार आणि गृहराज्यमंत्री देखील होते.

तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघामधून दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिलीप धोत्रे हे मनसेचे जुने आणि जाणकार नेते आहेत. मनसेकडून अधिकृत परिपत्रक जाहीर करत २ उमेदवारांची नावं जाहीर केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या