मुंबई | Mumbai
दुकानावर मराठी पाट्या लावण्याच्या सक्तीविरोधात व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सोमवारी या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायालयाने व्यापारांना फटकारत दुकानावर २ महिन्यांत मराठी भाषेत पाट्या लावा, असा आदेश दिला. मविआ काळात दुकानावरील मराठी पाट्या सक्तीच्या करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. मात्र सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवला. दरम्यान या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मराठी पाट्या हा मुद्द्यावर मनसेने जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णायाने मान्यता मिळाल्याचे राज ठाकरे म्हणाले आहेत. याबाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली त्यासाठी तुमचे मनापासून अभिनंदन असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.
Accident News: स्कुल बस – रिक्षाचा भीषण अपघात; पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू
राज ठाकरे नेमके काय म्हणले?
“सस्नेह जय महाराष्ट्र
पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकाने, आस्थापन ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. ‘मराठी पाट्या’ ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली.
मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकाने, आस्थापने ह्यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? महाराष्ट्रात असाल तर मराठीत इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणे किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणे ह्यात विरोध करण्यासारखे काय होते. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे.”
भाजपला झटका! दक्षिणेतील मोठ्या मित्रपक्षानं सोडली साथ, लोकसभेपूर्वी चिंता वाढली
“असो, माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ह्या मुद्द्यावर संघर्ष केला, आता सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावर काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी, आणि हे पाहणे आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचे काम आहे.
दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. आणि इथले सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे पण लक्ष असेल हे विसरू नका.
‘मराठी पाट्या’ ह्याबाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली त्यासाठी तुमचे मनापासून अभिनंदन. तुम्ही सतर्क राहिलात तसेच पुढे देखील राहिले पाहिजेत.” असे राज ठाकरे म्हणाले आहेत.