मुंबई | Mumbai
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे, मनसेची मान्यत्ता रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर आता मनसे ही आक्रमक झाली आहे. मनसेने, ‘भैय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे का यावर विचार करावा लागेल’, असा इशारा दिला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा इशारा दिला आहे.
उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेमुळे वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत..यासंदर्भात मनसेचे मुंबई शहरध्यक्ष संदीप देशपांडे यांनी X वर पोस्ट केलीय. मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैय्ये प्रयत्न करणार असतील तर भैय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचे का यावर विचार करावा लागेल असा इशाराच संदीप देशपांडे यांनी दिलाय.
https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1909479710381187263
RSS,बजरंग दलात ९० टक्के कार्यकर्ते हे उत्तर भारतीय आहेत याचा आम्हाला गर्व आहे. त्यांचे वडील, काका, मोठे भाऊ, आजोबा ड्युटीवर आहेत ते तिथे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. त्यांच्या कानफाडीत तुम्ही मारताय. उद्या तुम्हाला या लोकांनी मदत केली पाहिजे हे कसले राजकारण. आम्ही तुमचा विरोध करतो, सर्वोच्च न्यायालयातून तुमच्याविरोधात आदेश आणणारच. सनातनी हिंदू पक्ष म्हणून आम्ही सर्वांना एकत्रित करून तुमच्याविरोधात उभे करणार, असा इशारा सुनील शुक्ला यांनी दिला आहे. यानंतर संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला आहे.
कुठला तरी भैय्या म्हणे कोर्टात गेला आहे की मनसेची मान्यता रद्द करावी .मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैय्ये प्रयत्न करणार असतील तर भैय्यांना मुंबईत ,महाराष्ट्रात राहू द्यायचे का यावर विचार करावा लागेल. तसेच माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, आमचा पक्ष राहावा की राहू नये हे आता भय्ये ठरवणार का? त्या याचिकेमागील षड्यंत्र तुम्ही लक्षात घ्या. हे सगळे प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे षड्यंत्र आहे. हे भाजपाचे षड्यंत्र आहे. हे लोक भाजपाचेच पिट्टू आहेत. भाजपावाले यांच्या माध्यमातून आमच्या पक्षाला नख लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही अशा गोष्टींना घाबरत नाही. आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्या लोकांना इथे ठेवायचे की नाही याचाही आम्हाला विचार करावा लागेल, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
काय आहे याचिका?
उत्तर भारताीयांबद्दल राज ठाकरे द्वेष पसरवत असल्याचा आरोप करत मनसेची मान्यता रद्द करावी तसेच राज ठाकरेंवर कारवाई करावी अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आलीय. यासंबंधी निवडणूक आयोग, गृहमंत्रालयाला देखील त्यांनी पत्र पाठवले. मराठी न बोलणाऱ्या लोकांना मारहाण करणे त्यांच्या विषयी द्वेषपूर्ण भाषा बोलणे. द्वेष पसरवणे. दमदाटी करणे यामुळे मनसेची मान्यता रद्द करण्यात यावी तसेच राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीला घेऊन सर्वोच्च न्यायालयात उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी याचिका केली आहे तसेच यासंबंधी निवडणूक आयोग, गृहमंत्रालय यांना देखील पत्र पाठवण्यात आले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा