मुंबई | Mumbai
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मागील दोन दिवसांत भाजपा-शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, यावरून मनसेचे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी राऊतांना एक पत्र लिहून मार्मिक टोले लगावले आहे.
संदीप देशपांडे पत्रात म्हणाले की, ‘आदरणीय संजय राऊत साहेब, सस्नेह जय महाराष्ट्र ! हे येडंxx मला का पत्र लिहतंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण विश्वास ठेवा वा ठेवू नका पण तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजी पोटीच हे पत्र लिहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चिडचिड होताना दिसत आहे.
‘आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चिडचिड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. माणूस attention seeking होतो’, असे ते पुढे म्हणाले.
भररस्त्यात भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्याचे लचके तोडले; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
‘तुम्ही कितीही नाकारलंत तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण रोजच्या रोज ज्या पत्रकार परिषद घेता त्या ऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या, मग हळू हळू आठवड्यातून एकदा घ्या, असं करता येईल का ते जरूर पाहा आणि ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या अगोदर किमान दहा ते पंधरा मिनिटे मेडिटेशन करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल, असे देशपांडे पुढे म्हणाले.
‘आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपणच सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांच्या नादी लावलं आहे आणि त्यामुळेच शिवसेना हातून गेली ही सल (guilty feeling) मनाला लावून घेतली आहे, ती पहिले आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच ह्या ऱ्हासाला जबाबदार नाहीत,असे देशपांडे म्हणाले.
VIDEO : भर कार्यक्रमात सोनू निगमला धक्काबुक्की; अंगरक्षक जखमी
‘उद्धव साहेब आणि आदित्य साहेब सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत हे लक्षात घ्या. नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर पवार…पवार….असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल. कधी काळी तुमचा आणि माझा पक्ष भिन्न असला तरी आपल्यात व्यक्तिगत संवाद होता. ममत्व होते. त्याच काळजीपोटी हा पत्रप्रपंच ! पटलं तर घ्या…नाही पटलं तर चू xx आहे असं म्हणून विसरून जा , आपला नम्र,संदीप देशपांडे, असे ते पुढे म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसात राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे-भाजप सरकारवर मोठ्या प्रमाणावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर वार-पलटवारांची मालिकाच सुरु झाली आहे. अगदी खालच्या स्तरावर एकमेकांवर टीका करण्याचे राजकारण राज्यात सुरु झाले आहे.
काल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप केलाय. श्रीकांत शिंदेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली आहे. ही सुपारी ठाण्यातील कुख्यात गुंड राजा ठाकूर आणि त्याच्या टोळीला देण्यात आली आहेस, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला.
संतापजनक! ६५ वर्षाच्या वृद्धाचा दोन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार