Tuesday, April 1, 2025
Homeमुख्य बातम्याMNS : "मराठी गया तेल लगाने, तुम…"; मुजोरी करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेने...

MNS : “मराठी गया तेल लगाने, तुम…”; मुजोरी करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेने ‘असा’ शिकवला धडा

मुंबई । Mumbai

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी महाराष्ट्रातच तिचा अवमान थांबत नाही. अलीकडेच पवईतील एल अँड टी (L&T) कंपनीत एका सुरक्षा रक्षकाने मराठीबद्दल अपशब्द वापरल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच धडा शिकवला.

- Advertisement -

मंगळवार, १ एप्रिल २०२५ रोजी पवईतील L&T कंपनीत एका मराठी व्यक्तीशी सुरक्षा रक्षकाचा वाद झाला. उत्तर भारतातील असलेल्या या रक्षकाला मराठी येत नव्हते. वादादरम्यान त्याने “मराठी गया तेल लगाने” असे उद्गार काढले. हे ऐकून मनसैनिकांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले.

सुरक्षा रक्षकाच्या मराठीविरोधी वक्तव्याने संतापलेल्या मनसैनिकांनी त्याला कानशिलात लगावली. “मराठी येत नसेल तर शिकायला हवं, पण तिचा अपमान सहन करणार नाही,” असे कार्यकर्त्यांनी ठणकावले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मनसैनिकांनी सुरक्षा रक्षकाच्या सुपरवायझरलाही खडसावले. “चार वर्षांपासून हा इथे काम करतो, मराठी का शिकला नाही?” असा सवाल करत त्यांनी सुपरवायझरला दम भरला. “मराठी माणसांशी मराठीतच बोला, ‘तेल लावायला गेली’ वगैरे चालणार नाही,” असेही सुनावले.

मराठीचा अवमान करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा मनसैनिकांनी दिला. “मराठी येत नसेल तर शिका, पण तिची विटंबना कराल तर खपवून घेणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेने पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा चर्चेत आला आहे.

महाराष्ट्रात मराठीचा अपमान वारंवार होत असताना प्रशासन काय करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पवईतील या घटनेने मराठी भाषिकांमध्ये असंतोष पसरला असून, यापुढे अशा प्रकरणांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Rain News : जिल्ह्यात ढगाळ वातावरण; ‘या’ तालुक्यात तुरळक अवकाळी...

0
नाशिक | Nashik नाशिक शहरासह (Nashik City) ग्रामीण भागात (Rural Area) आज सकाळपासून ढगाळ वातावरण (Cloudy Weather) बघायला मिळत आहे. त्यातच नाशिक शहरातील इंदिरानगरसह सिन्नर...