मुंबई | Mumbai
गेल्या अनेक वर्षंपासून महाराष्ट्रातल्या मुंबई-गोवा महामार्गाचे (Mumbai-Goa Highway) काम रखडले आहे. या महामार्गाचे आतापर्यंत जे काम झालेय त्याची परिस्थितीही भीषण आहे. त्यामुळे खाचखळग्यातून मार्गक्रमण करत वाहनचालक आणि कोकणवासियांचा खडतर प्रवास गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
संसदेत मंत्री नितीन गडकरी (Central Minister Nitin Gadkari) आणि राज्याच्या विधिमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी मुंबई-गोवा महामार्गाबाबत दिलेल्या उत्तरामुळे हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार अशी स्थिती या हायवेच्या कामात निर्माण झालीय का असा प्रश्न मनसेने (MNS Twitt’s Video) उपस्थित केला आहे.
Kishori Pednekar : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
राज्यात आतापर्यंत ज्या-ज्या पक्षाचे सरकार स्थापन झाले, त्या प्रत्येक सरकारला मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून विरोधकांनी अनेकदा धारेवर धरले आहे. सध्या राज्यात भाजपा-शिंदे गटाचे सरकार आहे. तर गेल्या नऊ वर्षांपासून केंद्रात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे या सरकारमधील मंत्र्याना यावरून अनेकदा प्रश्न विचारले गेले. परंतु कोणताही नेता यावर तोडगा काढू शकला नाही.
मनसेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून गडकरी आणि फडणवीस या दोघांच्या भाषणाची क्लिप टाकली आहे. त्यावर मनसेने म्हटले की, अखेर मुंबई-गोवा हायवेसाठी राज्यकर्त्यांनीही हात टेकले. सर्व सत्ताधीश नेत्यांची उत्तरे ऐका..असे हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार असतील तर कोकणी बांधवाने कुणाकडे दाद मागायची? हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रखर ‘राज’कीय इच्छाशक्ती हवी असं त्यांनी सांगितले. काय म्हणाले नितीन गडकरी-देवेंद्र फडणवीस? मुंबई-गोवा महामार्गावर बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, हे अत्यंत दुर्दैवी आहे.
पुढे ट्विटमध्ये असे ही म्हंटेल आहे की, माझ्याकडे यावर भाष्य करण्यासारखं काही नाही. मला उत्तर देताना खेद वाटतो. देशात मुंबई-गोवा आणि सिंगरौली या महामार्गावर पुस्तक लिहिलं जाऊ शकते. दुर्दैवी आहे, माझ्याकडे याबाबत उत्तर नाही असे त्यांनी संसदेत म्हटले. तर मुंबई-गोवा महामार्गाबाबत अनेक कायदेशीर, कंत्राटदारांच्या अडचणी येतायेत.
स्वत: गडकरींनी इतका प्रयत्न करूनही ज्यांनी देशभरात रेकॉर्डब्रेक रस्ते बांधले, पण त्यांनाही मुंबई-गोवा महामार्गाच्या बांधकामात अनेक अडचणी आल्या, यश आले नाही असे देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत खंत व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो झळकले थेट टाईम्स स्क्वेअरवर
मुंबई-गोवा मार्गावर खड्ड्यांसोबत तळ्याची मोफत सोय वडखळ ते कोलाडमध्ये गडब, आमटेम, कोलेटी, पळस, नागोठणे, वाकण, ऐनघर, सुकेळी खिंड, खांब, वरसगाव येथून पुढे इंदापूरपर्यंत रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातून मार्ग काढताना लहान-मोठ्या वाहनांसह, अवजड वाहनांच्या चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. चार ते सहा फूट रुंदीचे व सुमारे एक ते दीड फूट खोलीचे हे खड्डे आहेत. त्यात पावसाचे पाणी भरल्याने वाहने खड्ड्यात आदळून कित्येकदा त्यांचा तोल जाऊन अपघात होतो. रात्रीच्या वेळी तर वाहनचालकांची कसोटी लागते.
दरम्यान, हे व्हिडीओ शेअर करत मनसेने म्हटले आहे की, अखेर मुंबई-गोवा हायवेसाठी राज्यकर्त्यांनीही हात टेकले… सर्वसत्ताधीश नेत्यांची उत्तरे ऐका… असे हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार असतील तर कोकणी बांधवाने कुणाकडे दाद मागायची? हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रखर ‘राज’कीय इच्छाशक्ती हवी!