मुंबई | Mumbai
मागील आठवड्यात रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी (Irshalwadi) गावावर दरड कोसळली. या भीषण दुर्घटनेत २७ हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे महाराष्ट्राला मोठा हादरा बसला. दुर्घटनेनंतर सरकार आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. आता यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) केलेले ट्विट चर्चेत आले आहे…
मनसेने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, धक्कादायक! २५ जून २०१५ रोजी इर्शाळवाडी ग्रामस्थांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून कळवलं होतं की, ‘माळीण गावासारखे संकट आमच्यावरही कोसळू शकतं, त्यामुळे आमच्या वाडीचं चौक सर्व्हे क्र. २४ येथे पुनर्वसन करा. २०१५ साली किंवा त्यानंतर या पत्राची दखल घेतली गेली असती तर आज शेकडो प्राण वाचले असते आणि ग्रामस्थ सुरक्षित नांदले असते. शासन-प्रशासनांनी तत्परता आणि संवेदनशीलता दाखवली नाही तर समाजाला केवढी मोठी किंमत चुकवावी लागते त्याचं हे जीवघेणं उदाहरण!
दिल्ली पुन्हा हादरली! भरदिवसा कॉलेजच्या विद्यार्थिनीवर रॉडने हल्ला, पीडितेचा जागीच मृत्यू
दरम्यान, गेल्या महिन्यात कोकण दौऱ्यावर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एका भाषणात कोकणात पावसाळ्यात दरडी कोसळतील, त्यामुळे प्रशासनाने सजग असावं असा इशारा दिला होता.
पुण्यातील अपघाताचा थरारक VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, “देव तारी त्याला कोण मारी!”