Tuesday, November 5, 2024
Homeनगरमनसेचे अनोखे आंदोलन! रस्त्यावर शेणाचा सडा देत पालिकेचा निषेध

मनसेचे अनोखे आंदोलन! रस्त्यावर शेणाचा सडा देत पालिकेचा निषेध

कोपरगाव | Kopergoan

रस्त्यावर शेणाचा सडा व फुलांच्या पाकळ्या टाकत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) कोपरगाव नगरपालिकेचा (Kopergoan Nagarpalika) निषेध करत आंदोलन केले.

- Advertisement -

शहरातील रस्त्यांना तलावाचे स्वरूप आलेले असुन त्याची अवस्था दयनीय झालेली आहे. याकडे नगरपालिका पदाधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. येणाऱ्या सणासुदीच्या काळात खड्डे व धुळीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) शहराध्यक्ष सतीष काकडे यांच्या नेतृत्वाखाली दि. २७ राजी शुक्रवारी नेहरुभाजी बाजार येथील गुरुद्वारा रस्त्यावर शेणाचा सडा टाकून अनोख्या पद्धतीने आंदोलन (Agitation) करत पालिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या