Saturday, May 4, 2024
Homeनाशिकमनसेना युवानेते अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर

मनसेना युवानेते अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) संघटन मजबूत करण्यासह आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik Municipal Election) दृष्टीने नियोजन करण्यासाठी पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे (Youth leader Amit Thackeray) दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहे.

- Advertisement -

मंगळवारी (दि.28) त्यांचे आगमन होणार असून बुधवार पर्यंत ते नाशिक (nashik) मध्ये मुक्काम करणार आहे. यामध्ये ते प्रभागनिहाय बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांची वन टू वन चर्चा (One to one discussion) करणार आहे. अशी माहिती श्याडो कॅबिनेटचे सदस्य पराग शिंत्रे (Shadow Cabinet Member Parag Shintre) यांनी दिली. पक्षाच्या मुख्यालय असलेल्या राजगड कार्यालयावर सर्व बैठका होणार आहे अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकारी तसेच मनसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नाशिक महापालिकेची निवडणूक (election) कधीही लागण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने विविध राजकीय पक्षांनी (political parties) जोरदार तयारी सुरू केलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) तसेच भारतीय जनता पक्ष युती करून निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा असताना पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी यापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची घोषणा केलेली आहे.

त्यामुळे नाशिकमधील सर्व 122 जागांवर पक्षाचे उमेदवार निवडणूक (election) रिंगणात उतरणार आहे. दरम्यान यंदाची निवडणुकीची कमान युवा नेते अमित ठाकरे यांच्या हातात राहणार असल्याचे सांगितले जात असल्यामुळे त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाला आहे.

कोणाला मिळणार प्रमोशन?

महाराष्ट्र निर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मागील अनेक महिन्यांपासून बदलाचे संकेत मिळत आहे. पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांना प्रमोशन देऊन प्रदेश पातळीवर पाठवण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. युवा पदाधिकाऱ्यांना मुख्य संघटनेत आणून त्यांना आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने जबाबदाऱ्या देण्यात येणार असल्याचे देखील समजते.

दरम्यान दोन महिन्यांनंतर युवा नेते अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत असून दोन दिवस ते संघटन बांधणीवर विशेष लक्ष देणार आहे. सकाळी साडेदहा वाजता त्यांचे नाशिकला आगमन झाल्यावर अकरा वाजेपासून ठक्कर बाजार येथील पक्षाच्या कार्यालयात ते दिवसभर पदाधिकाऱ्यांची चर्चा करणार आहे तर दुसऱ्या दिवशी देखील असाच कार्यक्रम राहणार आहे. त्यामुळे कोणाला प्रमोशन मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या