Monday, May 27, 2024
Homeनाशिकजिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेची सभासदांसाठी 'ही' सुविधा उपलब्ध

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेची सभासदांसाठी ‘ही’ सुविधा उपलब्ध

नाशिक | प्रतिनिधी

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेची मुख्य शाखा असलेल्या भाभानगर येथील शाखा सकाळी साडेदहा ते साडेसहा, या वेळात कर्मचारी सभासदांसाठी खुली राहणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांची आर्थिक वाहिनी असलेल्या जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बँकेचे जिल्हाभरात १३ हजारांहून अधिक कर्मचारी सभासद आहे.

- Advertisement -

बँकेची मुख्य शाखा ही शहरातील भाभानगर भागात असून, रविवार कारंजा, कळवण, मालेगाव व येवला येथे शाखा आहेत. शासकीय कर्मचारी सभासद असल्याने, सभासद हितासाठी बँकेची वेळ ही सकाळी नऊ ते साडेबारा व सायंकाळी पाच ते साडेआठ, ही होती.

मात्र बँकेने कोअर बँकिंग सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याने सभासदांना ही सेवा मिळावी, यासाठी ही वेळ बदलली असल्याचे बँकेच्या संचालक मंडळाकडून सांगण्यात येत आहे.केवळ भामानगर शाखेच्या वेळात बदल असून, रविवारसह सर्व शाखांचे वेळा ‘जैसे थे’ असल्याचेही बँकेने स्पष्ट केले आहे.

कर्मचारी सभासदांसाठी बँकेने कोअर बँकिंग ही सुविधा सुरू केली आहे. याशिवाय मोबाईल बँकिंग सुविधादेखील मिळणार आहे. त्यामुळे सभासदाला आता कोणत्याही शाखेतून कर्ज उपलब्ध होणार आहे. त्यास मुख्य शाखेतच येण्याची गरज नाही. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकेकडून विविध माहिती मागविली जाते, मात्र त्यावेळात बँक बंद असल्याने अडचण येत होती.

यासाठी केवळ मुख्य शाखेच्या वेळात हा बदल केला आहे. यात सभासदांची कोणतीही गैरसोय होणार नाही.असे अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे-पाटील यांनी सांगीतले. दरम्यान बँकाची वार्षीक सर्वसाधारण सभा रविवारी ( ता.३) सकाळी दहला प.सा.नाट्यगृहत होणार आहे. त्यावेळी बदललेल्या वेळेवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या