Tuesday, March 25, 2025
Homeनगरसेवानिवृत्त नायब तहसीलदरांना 1.20 लाखाला गंडा

सेवानिवृत्त नायब तहसीलदरांना 1.20 लाखाला गंडा

मोबाईल फोन हॅक करून काढले पैसे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मोबाईल फोन हॅक (Mobile Phone Hack) करून गुगल पे अ‍ॅपव्दारे सेवानिवृत्त नायब तहसीलदारांच्या बँक खात्यातून एक लाख 19 हजार 999 रूपये काढून घेत त्यांची फसवणूक (Fraud) करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. भास्कर शंकर मोरे (वय 74 रा. दिल्लीगेट) असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त नायब तहसीलदारांचे नाव आहे.

- Advertisement -

या प्रकरणी त्यांनी बुधवारी (21 ऑगस्ट) रात्री दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) अनोळखी बँक खातेधारकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचे स्टेट बँकेत खाते (Bank Account) असून त्या बँक खात्याला त्यांचा मोबाईल नंबर लिंक आहे. रविवारी (18 ऑगस्ट) मुलगा संजय हा फिर्यादीच्या मोबाईलमध्ये गुगल पे अ‍ॅप पाहत असताना त्याला फिर्यादीच्या बँक खात्यातून 16 जुलै रोजी 30 हजार रूपयांचे तीन ट्रॅन्झॅक्शन व 17 जुलै रोजी 29 हजार 999 रूपयाचे ट्रॅन्झॅक्शन झाल्याचे दिसून आले.

फिर्यादी यांनी कोणालाही पैसे पाठविलेले नसल्याने त्यांना शंका आल्याने त्यांनी स्टेट बँकेच्या चौपाटी कारंजा येथील शाखेत चौकशी केली असता मोबाईल फोन हॅक करून खात्यातून पैसे काढले गेल्याचे बँक अधिकार्‍यांनी फिर्यादी यांना सांगितले. त्यानंतर फिर्यादीच्या मुलाने नॅशनल सायबर क्राईम रिपोटींग पोर्टलवर (National Cyber ​​Crime Reporting Portal) तक्रार केली. परंतु सदर पैशांचे ट्रॅन्झॅक्शन कसे झाले याबाबत काही एक माहिती प्राप्त होत नसल्याने मोरे यांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार योगेश चव्हाण करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...