Saturday, September 14, 2024
Homeनाशिकमोबाइल टॉवर फक्त शोभेसाठी

मोबाइल टॉवर फक्त शोभेसाठी

सप्तशृंगीगड । इम्रान शहा | Saptashringigad

मागील अनेक महिन्यांपासून सप्तशृंगगडावर (Saptashringigad) ‘बीएसएनएल’ (BSNL) मोबाइल कंपनीचे ब्रॉडबँड नेटवर्क (Mobile company’s broadband network) व्यवस्थित मिळत नसल्याने ‘बीएसएनएल’ संबंधित असलेले ब्रॉडबँड (broadband) बँकेना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

नेटवर्क (network) मिळवण्यासाठी मोबाइल नंबर (mobile number) पोर्ट करुन देखील कोणत्याही मोबाइल कंपनीचा नेटवर्क मिळत नसल्याने नागरिक व्यापारी व शाळकरी विद्यार्थी (students) मेटाकुटीला आले आहे. संबंधित मोबाइल कंपन्यांनी मोबाईल नेटवर्क मधील तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करून चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सप्तशृंगगड परिसरातील मोबाइल ग्राहक करत आहे.

अर्धे शक्तिपीठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या पर्यटन स्थळ (Tourist destination) आहे. सप्तशृंगगडाला ‘ब’ दर्जा मिळाला असून सुद्धा दूरसंचार निगम अधिकारी जाणूनबुजून टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. येथे बीएसएनएलचा मोबाइल नेटवर्क टॉवर (Mobile network tower) असून त्यावर जिओ (Jio), वोडाफोनच्या (Vodafone) छत्र्या आहे तर ऐअरटेलने (airtel) आपले स्वतंत्र टॉवर उभारलेले आहे. जिओची मोबाइल नेटवर्किंग थोडीफार ठीक आहे.

परंतु बीएसएनएलने तर जणू इतर मोबाइल कंपन्यांकडून चिरीमिरीचे संबंध प्रस्थापित केले की काय अशी परिस्थिती दिसून येत आहे. काही महिन्यापूर्वी बीएसएनएलची उत्कृष्ट मोबाईल सेवा मिळत असल्याने व चांगली इंटरनेट सर्व्हिस (Internet service) मिळत असल्याने अधिकांश लोकांनी बीएसएनएलचे नवीन सिमकार्ड (simcard) घेतले तर काहींनी आपले आयडिया (idea), वोडाफोन (vodafone), जिओचे (jio) नंबर बीएसएनएलमध्ये (BSNL) परिवर्तित करून घेतले.

परंतु मागील काही महिन्यापासून बीएसएनएलने ग्राहकांचे वांधे करून ठेवले आहे. मोबाईल ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी, या हेतूने ठिकठिकाणी लाखो रुपये खर्च करून मोबाईल टॉवर्स उभारण्यात आले. कळवण तालुक्यात काही ठिकाणी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु हे अधिकारी ग्राहकांना दिल्या जाणार्‍या सुविधाकडे लक्ष देत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सध्यातरी मोबाइल टॉवर्स शोभेची वस्तू बनले आहे.

ग्राहकांच्या तक्रारीला दाद दिली जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केली जात आहे. आजघडीला मोबाइल कंपन्यांच्या भरोशावर स्थानिक बँक, सेमी गव्हर्मेंटची कार्यालय व हजारोच्या संख्येत असलेले मोबाईल धारक अवलंबून आहेत. परंतु याच मोबाईल कंपन्यांकडून नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने अनेक वेळा बँकांमधील व्यवहाराला खोळंबा निर्माण झाला आहे.

याबाबत संबंधित मोबाईल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी गांभीर्याने दखल घेऊन ग्राहकांना अत्यावश्यक व व्यवस्थित सुविधा मिळावी, यासाठी तातडीने उपाय योजना करुन ‘बीएसएनएल’ मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क अविरत मिळेल अशी सेवा देण्याची मागणी केली जात आहे.

सप्तशृंगगडावर नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक लि; मोठ्या संख्येने सभासद आहे. याठिकाणी पैशाची देवाण – घेवाण ‘बीएसएनएल’ च्या माध्यमातून ब्रॉडबँड ऑनलाइन व्यवहार होत असल्याने बीएसएनएल नेटवर्क काही महिन्यांपासून बंद आहे. या ठिकाणी नागरिकांना सुविधा देण्यासाठी खूप कठीणाईचा सामना करावा लागत आहे. संबंधित अधिकार्‍यांना वारंवार सांगून सुद्धा आंधळ्याच सोंग करतांना दिसून येत आहे.

श्री. पाठक, व्यवस्थापक – नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक, सप्तशृंगगड

- Advertisment -

ताज्या बातम्या