नाशिक । प्रतिनिधी Nashik
चीनसह अन्य अनेक देशांत पुन्हा एकदा करोना रुग्णांची ( Corona Patients)संख्या वाढत असल्यानेे राज्य सरकार अलर्ट झाले आहे. आरोग्य मंत्रालयाने( Ministry of Health) मंगळवारी (दि. 27) करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात एकाचवेळी मॉकड्रिल( MockDrill) करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी नाशिक जिल्ह्यातही मॉकड्रिल केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरण डी.( Collector Gangatharan D) यांनी दिली.
गंगाथरण डी. म्हणाले की, सध्या नाशिक जिल्ह्यात घाबरण्यासारखे वातावरण नसले तरी काळजी घेणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने वरिष्ठ पातळवरुन आढावा घेतला गेला असून जिल्ह्यातील रुग्णालये, त्यातील खाटा, औषधांंचा साठा, ऑक्सिजनचा साठा व्यवस्थित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अजून जिल्ह्यात मास्कसक्ती केलेली नाही. विमानतळावरून येणार्या प्रवाशांचे रॅडम सॅपलिंग केले जाणार आहे. जर करोना पॉझिटिव्ह आले तर त्याचे नियमांचे पालन करावे लागेल. जिल्ह्यात करोना लसकेंद्र पुन्हा सुरु केले जाणार आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावा. सध्या कोणत्याही प्रकारचे निर्बर्ंंध नाहीत. पण बचावासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. ज्या लोकांना आधीपासून काही आजार आहेत, त्यांनी नियमांचे पालन करावे. आरोग्य मंत्रालय दर आठवड्याला आढावा घेणार आहे.
‘तान’चे पर्यटकांना आवाहन
भारतामधील बहुतांश लोकांचे कोविडचे लसीकरण झालेले असून भारतीय नागरिकांची कोविड प्रतिकार क्षमता ही चांगली आहे व आधी आलेला कोविड लाटेसारखा प्रकार संभवत नाही. मात्र सोशल मीडिया व इतर काही ठिकाणी विनाकारण कोविडचा बागुलबुवा उभा केला जात असल्याचा आरोप करतानाच सरकारने जारी केलेल्या परिपत्रकांकडेच लक्ष देऊन सरकारने अधिकृतरित्या जारी केलेले आरोग्य विषयक नियमांचे पालन करा, विविध सोशल मीडियावर फिरणार्या अतिरंजीत खोट्या अफवांना बळी न पडता घाबरु नये, असे आवाहन तानच्या माध्यमातून प्रसिध्दिी पत्रकाद्वारे केले आहे.
आपण येत्या पर्यटन हंगामासाठी जे देशांतर्गत अथवा आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे बुकिंग केलेले आहेत ते तसेच ठेवून मोकळ्या मनाने पर्यटनाचा आनंद घ्यावा. या उपर सरकारने काही नवीन सूचना जारी केल्या तर ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नासिक त्या आपणापर्यंत तातडीने पोचवायची व्यवस्था केले जाईल, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी जानेवारीमध्ये बहुप्रतिक्षित तानच्या एक्स्पोचे देखील आयोजन करण्यात आले असून त्या बाबतची माहिती लवकरच आपणापर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ नासिक (तान) तर्फे अध्यक्ष सागर वाघचौरे, मनोज वासवानी, अरुण सूर्यवंशी, सचित लोनारी, इशान जोशी, अंबरीश मोरे, अमित चंडेल यांनी केले आहे.