Tuesday, June 10, 2025
Homeमनोरंजनप्रसिध्द अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू; बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

प्रसिध्द अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू; बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

मुंबई | Mumbai

- Advertisement -

प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंग राजपूत (Aditya Singh Rajput) यांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी अंधेरी येथील त्याच्या घरात तो बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळला आहे. आदित्यच्या मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला आहे…

विशेष म्हणजे या अभिनेत्याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. या अभिनेत्याचे नाव आदित्य सिंह राजपूत असे असून CID मालिकेत देखील काही वर्ष महत्वाच्या भूमिकेत आदित्य सिंह राजपूत होता. अनेक जाहिरातीमध्येही आदित्य सिंह राजपूत याने काम केले आहे. सोशल मीडियावर (Social media) तगडी फॅन फाॅलोइंग ही आदित्य सिंह राजपूत याची बघायला मिळते.

अभिनेता आदित्य सिंह राजपूत हा त्याच्या अंधेरी भागातील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. त्याच्या मृत्यूचा तपास चालू आहे, अशी माहिती ANI या वृत्तसंस्थेला मुंबई पोलिसांनी दिली आहे.

आदित्य सिंह राजपूत हा 32 वर्षाचा होता. आदित्य सिंह राजपूत याने आपल्या करिअरची सुरूवात ही वयाच्या 17 व्या वर्षीच केली होती. अत्यंत कमी कालावधीमध्ये प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाच्या जोराने त्याने छाप सोडली होती. आदित्य सिंह राजपूत याचे निधन नेमके कशाने झाले यावर जोरदार चर्चा या रंगताना दिसत आहेत.

एका रिपोर्टनुसार आदित्य सिंह राजपूत याचे निधन हे ड्रग्समुळे झाल्याचे सांगितले जात असून त्याच्या जवळच्या मित्राने याबाबत माहिती दिल्याचे रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे. आदित्य सिंह राजपूत याने आपल्या करिअरची सुरूवात ही मॉडल म्हणून केली होती.

आदित्य 300 हून अधिक जाहिरात व्हिडीओंमध्ये दिसला होता. Splitsvilla या रिअॅलिटी शोमध्येही तो दिसला होता. मैंने गांधी को नही मारा आणि क्रांतिवीर यांसारख्या चित्रपटात त्याने काम केलं होतं. त्याने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : एसटी वाहकाला प्रवाशाकडून मारहाण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar तिकीटाच्या पैशावरून एसटी वाहक व प्रवाशामध्ये वाद झाला. या वादातून प्रवाशाने वाहकाला मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची घटना सोमवारी पहाटे...