Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक, नंदुरबारमध्ये पावसाचा अंदाज

नाशिक, नंदुरबारमध्ये पावसाचा अंदाज

मुंबई

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा (monsoon) पाऊस सक्रिय होत आहे. आज नाशिक (nashik), नंदुरबार(nandurbar), सोलापुर(sopalpur), पुण्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चांगले ढग निर्माण झाले आहे.

- Advertisement -

हवामान विभागाचे ज्येष्ठ अधिकारी के.एस.होसाळीकर (k s hosalikar)यांनी टि्वट करत राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल याची माहिती दिली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, पुणे जिल्ह्यातील घाट प्रदेश, सोलापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्रतवण्यात आला आहे.

हवामान विभागानं १७ ऑगस्टला राज्याच्या विविध भागात पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या