Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याPM MODI 3.0 : नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान

PM MODI 3.0 : नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान

नवी दिल्ली । प्रतिनिधी New Delhi

- Advertisement -

लोकसभेच्या निवडणुकीच्या निकाला नंतर मोदी 3.0 सरकारच्या शपथविधी सोहळ्याची राजधानी नवी दिल्लीत जय्यत तयारी सुरू होती. त्या नंतर आज सायंकाळी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत शपथविधी झाला. प्रारंभी राष्ट्रगीत होऊन शपथविधीचा सोहळा सुरु झाला. नरेंद्र मोदी यांनी सलग तिसर्‍यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यावेळी अमित शहा, नितीन गडकरी, जे.पी.नड्डा शिवराजसिंग चव्हाण, निर्मला सितारमन, डॉ. एस. जयशंकर, यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान राष्ट्रपती भवनात एनडीए सरकार मधील 72 मंत्र्यांनी शपथ घेतली या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या पाच कंपन्या, नॅशनल सिक्युरिटी गार्ड कमांडो, ड्रोन आणि ‘स्नायपर्स’ तैनात करण्यात आल्या होत्या.

या सोहळ्यासाठी शेजारील ७ देशांच्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित करण्यात आले होते. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्यासह श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे हे या समारंभाला उपस्थित होते .

या सोहळ्यात देशभरातले 1,569 आमदार, पद्म पुरस्कारप्राप्त मान्यवर, न्याय, वैद्यक क्षेत्रासह कलाकार, प्रभावी लोक,विविध धर्मांचे 50 धर्मगुरू, ‘मन की बात’मध्ये उल्लेख केलेल्या व्यक्ती,वंदे भारतचे 10 लोको पायलट.,सेंट्रल विस्टा उभारणारे मजूर, स्वच्छता कर्मचारी, केंद्रीय योजनांचे लाभार्थी.यांना ही आमंत्रित करण्यात आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या