Monday, September 16, 2024
Homeदेश विदेशऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; मोदी सरकारने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; मोदी सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

- Advertisement -

देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना (Sugarcane Producer Farmers) केंद्र सरकारने (Central Government) मोठा दिलासा दिला आहे. २८ जून रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊसाची किमान आधारभूत किंमत म्हणजेच एमएसपी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऊसावरील एमएसपी (FRP On Sugarcane) प्रति क्विंटल १० रुपयांनी वाढविण्यात आली आहे. कृषि लागत आणि मुल्य आयोगाने यापूर्वीच सरकारकडे यासंदर्भात शिफारस केली होती. आता, कॅबिनेटच्या बैठकीनंतर (Cabinate Meeting) सरकारने यास मंजुरीही दिली आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे उसाच्या एफआरपीमध्ये ३०५ वरून वाढ होऊन ३१५ रुपयांची वाढ प्रतिक्विंटलमागे होणार आहे. विशेष करुन या वर्षीच्या ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या गळीत हंगामापासून हा निर्णय लागू होणार आहे. ३० डिसेंबर २०२४ पर्यंत यंदाचा हंगाम सुरू राहिल. सन २०२१ मध्ये ऊसाच्या एमएसपीमध्ये ५ रुपयांची वाढ करुन ती २९० रुपये करण्यात आली होती. त्यानंतर, २०२२ मध्ये त्यात १५ रुपयांची वाढ करुन ती ३०५ पर्यंत पोहोचवण्यात आली. आता, त्यात आणखी १० रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे, ऊसाच्या यंदाच्या नवीन हंगामात एमएसपी ३१५ रुपये करण्यात आली आहे.

दरम्यान, याचा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. उत्तर प्रदेशामध्ये उस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२२-२३ मध्ये उत्तर प्रदेशात २८.५३ लाख हेक्टर क्षेत्रामध्ये उसाची लागवड करण्यात आली होती. त्याच प्रमाणे महाराष्ट्रात देखील गेल्या वर्षी १४.९ लाख हेक्टरमध्ये उसाची लागवड करण्यात आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या