Wednesday, September 11, 2024
Homeब्रेकिंग न्यूजनाशकात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली; तुम्ही ४ जून नंतर …

नाशकात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली; तुम्ही ४ जून नंतर …

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार सभेचे आज नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

उद्धव ठाकरे व सहकारी नेत्यांचे सभास्थळी आगमन होताच फटाक्यांची जोरदार आताषबाजी करण्यात आली.हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान श्रोत्यांनी खच्चुन भरले होते.विशेष म्हणजे पाऊस भरुन आला तरी सभेत कोणताही व्यत्यय आला नाही.आजच्या सभेने महाविकास आघाडीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

या वेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर नकली शिवसेना म्हणणाऱ्याना ठाकरे शैलीत टीकास्त्र सोडले. येणाऱ्या निवडणुकीत देशभक्त मोदींची हुकुमशाही नाहीशी करून टाकणार आहेत आज तुम्ही सर्वे चोरेले असून परंतु मशाल माझ्या कडे आहे. ही मशाल सर्व महाराष्ट्र उजळवून टाकणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

नाशिक मधील कांदा उत्पादक शेतकरयांना आवाहन करत मी जी लढाई लढतो की ती माझ्या साठी नसून ती आपल्या साठी आहे. आज हुकुमशाह विरुद्ध मी शेतकऱ्यांच्या बाजूने मी लढत आहे. गुजरात मधील कांदा निर्यात बंदी काढून फक्त महाराष्ट्रात निर्यात बंदी कां ?, कांदा निर्यात बंदी पूर्ण पणे उठलीच पाहिजे . मी तुम्हाला आश्वस्त करतो की इंडिया आघाडी सरकार सत्तेत आल्यास पूर्ण पणे शेतकरयांना न्याय देईल. असे उद्धव ठाकरे म्हणाले

या वेळी उद्धव ठाकरे यांनी आवाहन करत सांगितले की की नुसते बाळासाहेब बोलू नका ‘हिंदू हृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे’ म्हणा. मोदीजी तुम्ही माझ्या शिवसेनेची काळजी करू नका तर तुम्ही फक्त तुमच्या पक्षाची काळजी करा, तुम्ही ४ जून नंतर पंतप्रधान नसणार असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्याच बरोबर निवडणूक रोख्यांचा घोटाळा, देशातील बेरोजागारी , काश्मीर मधील ३७० कलम व उद्योगपती अडानी या बाबत ही त्यांनी नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले.

सभेच्या शेवटी त्यांनी नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या