Friday, November 1, 2024
Homeशब्दगंध॥ मोगरा फुलला ॥

॥ मोगरा फुलला ॥

फुलांच्या बाजारात, घरातील-बाल्कनीतील कुंड्यांमध्ये मोगरा फुलला की खुश्शाल समजावे उन्हाळा सुरु झाला. मोगरा! गाभारा सुगंधाने भारुन टाकतो. कवींच्या कवितेत मानाचे पान पटकावतो. महिलांचे भावविश्व फुलवतो. नववधूला सजवतो.

शेतकर्‍यांचा, विक्रेत्यांचा आर्थिक आधारही बनतो. कीर्तनकारांना त्यातील आध्यात्मिक अर्थ खुणावतो. त्याच्या गंधाने सगळेच वेडावतात. मोगर्‍याकडे ज्याने त्याने त्याच्या नजरेने पाहावे हीच तर मोगर्‍याची खासियत. त्या विविध दृष्टिकोनांचा वेध घेण्याचा प्रयत्न म्हणजेच

- Advertisement -

॥ मोगरा फुलला ॥

चांदण्यात झुलतो बाई गंध मोगरा

गंधामधूनी भिजतो गं चंद्र साजिरा

पीस मयूरी अलगद हे

या हृदयातूनी पहिली प्रीती

साद घालिते या गाण्यातूनी

निळावल्या स्वप्नांचा मोर नाचरा

मोहरल्या वाटा आता,

मंतरली राने हुरहुरल्या शपथा येथे,

झुरमुरली पाने अधरांचा, स्पर्शांचा,

भास बावरा

तळहातावर भिजली मेंदी,

स्वप्न होऊनी ओठांवरती रुजले गाणे

जन्म होऊनी ध्यासांचा,

भासांचा गोड भोवरा

-गीतकार : प्रवीण दवणे

-संगीतकार : श्रीधर फडके

– गायिका : अनुराधा पौडवाल

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या