Monday, November 25, 2024
HomeराजकीयNCP Sharad Pawar : पवारांनी ऐनवेळी मोहोळचा उमेदवार बदलला; सिद्धी कदम यांच्याऐवजी...

NCP Sharad Pawar : पवारांनी ऐनवेळी मोहोळचा उमेदवार बदलला; सिद्धी कदम यांच्याऐवजी ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी

मुंबई । Mumbai

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून सोलापूरच्या मोहोळ मतदारसंघातून सिद्धी रमेश कदम यांना देण्यात आलेली उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. सिद्धी या मोहोळचे माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांच्या कन्या आहेत.

- Advertisement -

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द करत त्यांच्या ऐवजी मोहोळमधून राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, मोहोळ (Mohol Constituency) तालुक्यातील काही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन सिद्धी कदम यांच्या उमेदवारीबाबत नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर मोहोळमध्ये उमेदवार बदलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सांगितली जात आहे.

शरद पवार आणि मोहोळ विधानसभेतील शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सिद्धी रमेश कदम यांचा नावे देण्यात आलेला एबी फॉर्म रद्द समजण्यात यावा, असे पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठवले आहे.

दरम्यान २०१९ च्या विधानसभेदरम्यान रमेश कदम जेलमध्ये असताना कन्या सिद्धी कदम यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. रमेश कदम हे जामिनावर बाहेर आहेत. अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळात झालेल्या घाटोळा प्रकरणात रमेश कदम यांना सलग ८ वर्षे जेलमध्ये राहावं लागलं.

याशिवाय आगामी काळात त्यांचा जामीन रद्द झाला तर पुन्हा जेलमध्ये जावं लागलं तर त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते. यामुळे शरद पवार गटाने रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी दिल्याची चर्चा होती. मात्र अखेर आता हा निर्णय बदण्यात आला असून सिद्धी यांची उमेदवारी रद्द झाली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या