Monday, September 30, 2024
Homeनगरमोहटादेवी गडावर यंदा व्हीआयपी दर्शन बंद!

मोहटादेवी गडावर यंदा व्हीआयपी दर्शन बंद!

नवरात्रोत्सवाचे भाविकांना वाजत-गाजत निमंत्रण

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून तालुक्यातील स्थानिक भाविकांना वाजत-गाजत निमंत्रण दिले जात आहे. मोहटा गावातील नागरिकांना सर्वप्रथम देवस्थाच्या वतीने वाजत-गाजत निमंत्रण पत्रिका दिली. त्यानंतर पाथर्डी शहर व शेवगाव शहरात हा उपक्रम राबविण्यात आला. दरम्यान, यावर्षी व्हीआयपींना गाभाराबंदचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. त्यामुळे व्हीआयपींना सर्वसामान्य भाविकांप्रमाणे बाहेरून दर्शन घ्यावे लागणार आहे. देवस्थान समितीच्या निर्णयाचे भाविकांमधून स्वागत होत आहे.

- Advertisement -

जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टच्या या उपक्रमाचे दोन्ही तालुक्यात स्वागत होत आहे. बँड पथकाने वाजत-गाजत घरपोहच निमंत्रण येत असल्याने स्थानिक भाविक भावनिक झाले असून पाहुण्या भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. या उपक्रमामुळे देवी गड परिसरातील नागरिकांना नवरात्र उत्सव सोहळा आपलासा वाटत असून प्रत्येक नागरिक नियोजनासी जोडला जाऊन तयारी करत आहे. 3 ते 16 ऑक्टोबरदरम्यान देवीगडावर नवरात्र उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यादरम्यान भजन कीर्तन, तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी व्हीआयपींना गाभाराबंदचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. त्यामुळे व्हीआयपींना सर्वसामान्य भाविकांप्रमाणे बाहेरून दर्शन घ्यावे लागणार आहे. देवस्थान समितीच्या निर्णयाचे भाविकांमधून स्वागत होत आहे.

यावर्षी पाऊस समाधानकारक असल्याने आनंदी वातावरण आहे. यामुळे राज्यासह व राज्याबाहेरून नवरात्र उत्सव काळात लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर येतील असा अंदाज असून त्यानूसार सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. गडाचा परिसर निसर्गाने फुलला असून दर्शनाबरोबरच भाविकांना निसर्गाचा आनंद घेता यावा, असे नियोजन करण्यात आले आहे. देवस्थान समिती व प्रशासन अहोरात्र नियोजनात व्यस्त आहेत.स्थानिक भाविक गडाशी जोडला जाऊन नवरात्र उत्सव आपलासा वाटावा, यासाठी वाजत गाजत निमंत्रण देण्याचा उपक्रम मागीलवर्षी देवस्थाने राबविला. या उपक्रमाचा चांगला परिणाम दिसून आल्याने यावर्षी शेवगाव तालुक्यात ही वाजत गाजत निमंत्रण देण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला. आठवडे बाजारात देवस्थानचे कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांना वाजत गाजत निमंत्रण पत्रिका होते.

ग्रामीण भागातून आलेली भाविक मनोभावे निमंत्रण पत्रिकाची दर्शन घेताना दिसले. मुख्य बाजारपेठेसह उपनगरातही बँड पथकासह घरोघरी जाऊन कर्मचार्‍यांनी निमंत्रण पत्रिका वाटल्या. यावर्षी उच्चांकी संख्येने भाविक येण्याचा अंदाज आहे. येणार्‍या प्रत्येक भाविकाला मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी देवस्थान समितीसह स्थानिक भाविक नियोजनात व्यस्त आहेत. देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश निरंजन नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त तथा दिवाणी न्यायाधीश मयूर पवार, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, तहसीलदार उद्धव नाईक, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, कल्याण बडे, शशिकांत दहिफळे, बाळासाहेब दहिफळे, विठ्ठल कुटे, अक्षय गोसावी, श्रीराम परतानी, डॉ. श्रीधर देशमुख, विक्रम वाडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे, लेखापाल संदीप घुले यासह सर्व कर्मचारी नियोजनात व्यस्त असून अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या