Saturday, July 27, 2024
Homeनगरसमुहाने भाविक आणणार्‍यांना पोलीसांची परवानगी आवश्यक

समुहाने भाविक आणणार्‍यांना पोलीसांची परवानगी आवश्यक

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

यावर्षी शारदीय नवरात्रोत्सवात राज्यातील भाविकांची गर्दी मोहटा देवस्थानात वाढणार आहे. एकाच वेळी समूहाने भाविकांची वाहने आणण्यापूर्वी देवस्थान समिती व पोलीस प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे. अशी सूचना प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी दिली.

- Advertisement -

शारदीय नवरात्र उत्सवाच्या कालावधीत मोहटा देवस्थानात होणार्‍या उत्सवा संबंधी देवस्थान समितीच्या सभागृहात प्रशासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा न्यायाधीश तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष सुनील गोसावी, पाथर्डीच्या न्यायाधीश अश्विनी बिराजदार, धर्मदाय उपायुक्त उषा पाटील, पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, तहसीलदार श्याम वाडकर, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, प्रभारी गटविकास अधिकारी डॉ जगदीश पालवे, वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे, आगारप्रमुख आरीफ पटेल, उपनिरीक्षक रामेश्वर कायंदे व सचिन लिमकर याशिवाय वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम, पालिका, पंचायत समिती आदी विभागांचे विभाग प्रमुख, सर्व विश्वस्त, उपस्थित होते.

यंदा शारदीय नवरात्रोत्सव 15 ऑक्टोबर पासून 26 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. वाहुक कोंडी, एजंट, विक्रेत्यांचे हस्तक, खाजगी पार्किंग धारकांकडून वाहनधारकांची होणारी लुट, भाविकांची सुरक्षा आदी समस्यांवर उपायासाठी योवळी विशेष कृती कार्यक्रम आखण्यात आला. यंदा निवडणुकीचे वर्ष असल्याने काही लोकांकडून भाविकांची सहल आयोजित होऊन एकाच वेळेस अनेक गाड्या लागोपाठ येत असल्याने वाहतूक कोंडी होऊन भाविकांना त्रास होईल .त्यामुळे पूर्वपरवानगीशिवाय अचानक अशा स्वरूपात आलेल्या वाहनांना लांब अंतरावर गाड्या पार्किंग करायला भाग पाडण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. यंदा कोजागिरी पौर्णिमेला कृतज्ञता सोहळा घेण्याचा प्रयत्न देवस्थान समितीतर्फे केला जाईल असे भणगे म्हणाले.

व्हीआयपी लोकांना गाभारा दर्शन बंद

राजकीय व्यक्ती, मोठे पदाधिकारी, यासह व्हीआयपी लोकांना नवरात्र कालावधी दरम्यान गाभारा दर्शन बंद ठेवण्याबाबत आदेश जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष सुनील गोसावी यांनी देवस्थान समिती प्रशासनाला दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या