Wednesday, April 8, 2026
Homeदेश विदेशMojtaba Khamenei : इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याच्या नावाची घोषणा; जाणून घ्या कोण...

Mojtaba Khamenei : इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याच्या नावाची घोषणा; जाणून घ्या कोण आहे मोजतबा खामेनेई?

तेहरान । Tehran

पश्चिम आशियातील तणाव शिगेला पोहोचलेला असतानाच इराणमधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. इराणचे ८६ वर्षीय सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचा एका भीषण हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. २८ फेब्रुवारी रोजी तेहरानमधील त्यांच्या मुख्य कार्यालयाला लक्ष करून हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात खामेनेई यांच्या निधनानंतर आता इराणच्या नव्या सर्वोच्च नेतेपदी त्यांचे सुपुत्र मोजतबा खामेनेई यांची निवड करण्यात आल्याची अधिकृत घोषणा सरकारी प्रसारमाध्यमांनी केली आहे.

- Advertisement -

इराण सरकारने दिलेल्या माहितीनुसार, हा हवाई हल्ला विशेषतः सरकारी आणि प्रशासकीय ठिकाणांना लक्ष्य करून करण्यात आला होता. या हल्ल्यात अली खामेनेई यांचे कार्यालय उद्ध्वस्त झाले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. या घटनेने संपूर्ण इराणमध्ये खळबळ उडाली असून सरकारने देशात ४० दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. तसेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सात दिवसांची सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आली असून, प्रमुख शहरे आणि संवेदनशील सरकारी इमारतींबाहेर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड झालेले मोजतबा खामेनेई यांचा जन्म १९६९ मध्ये मशहद शहरात झाला. त्यांचे बालपण आणि शिक्षण धार्मिक वातावरणात झाले असून, त्यांनी इराण-इराक युद्धाच्या अंतिम टप्प्यात ‘रिव्होल्युशनरी गार्ड’मध्ये महत्त्वाची सेवा बजावली होती. मोजतबा हे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे वडील अली खामेनेई यांचे अत्यंत विश्वासू सल्लागार म्हणून ओळखले जात होते. पडद्यामागून अनेक मोठे धोरणात्मक निर्णय घेण्यात त्यांची मुख्य भूमिका असल्याचे राजकीय विश्लेषक मानतात.

मोजतबा खामेनेई यांनी यापूर्वी कधीही अधिकृतपणे कोणतेही मोठे सरकारी पद भूषवलेले नाही. मात्र, त्यांचे लष्कर आणि निमलष्करी दलांशी असलेले जवळचे संबंध त्यांना सत्तेच्या शिखरापर्यंत घेऊन जाण्यास कारणीभूत ठरले आहेत. २००९ मधील जनआंदोलने दडपून टाकण्यात त्यांचा मोठा हात असल्याचा आरोप त्यांच्यावर सातत्याने केला जातो. त्यांच्या या वादग्रस्त पार्श्वभूमीमुळे आणि आता थेट सर्वोच्च नेतेपदी वर्णी लागल्यामुळे इराणच्या अंतर्गत राजकारणात मोठ्या बदलांची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अली खामेनेई यांच्या निधनामुळे इराणमध्ये एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. ४० दिवसांच्या शोककाळात देशातील सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्याचे आदेश लष्कराला देण्यात आले आहेत. मोजतबा खामेनेई यांच्या नेतृत्वाखाली इराण आपली पुढील परराष्ट्र धोरणे आणि लष्करी कारवाया कशा प्रकारे राबवतो, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे आखाती देशांमधील युद्धाचे ढग अधिक गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.

ताज्या बातम्या

Baramati By-Poll : “काँग्रेसने बारामती निवडणुकीतून माघार घेतली नाही, भाजप मुद्दाम…”;...

0
मुंबई । Mumbai बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे....