Saturday, May 4, 2024
Homeनाशिकअल्पवयीन मुलीचा विनयभंग: गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचा विनयभंग: गुन्हा दाखल

नाशिक । Nashik

नळाला पाणी पाहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीस उचलून नेत तीचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी (दि.1) दुपारी सातपूरच्या शिवाजीनगर परिसरात घडली.

- Advertisement -

सागर दिलीप पगारे (28, रा. रामकृष्ण मंदिराजवळ, शिवाजीनगर) असे विनयभंग करणार्‍या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी पिडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार दुपारी नळाला पाणी आले किंवा नाही हे पाण्यासाठी तक्रारदार यांची १४ वर्षीय मुलगी गेली होती. यावेळी तेथे जवळच राहणार्‍या पगारे याने तीला उचलून त्याच्या घरी नेत तीचा विनयभंग केला.

याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक उपनिरिक्षक परदेशी करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या