Monday, June 24, 2024
Homeनगरबॅगेत ठेवलेल्या एक लाख रुपयांसह चार मोबाईलची चोरी

बॅगेत ठेवलेल्या एक लाख रुपयांसह चार मोबाईलची चोरी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

तालुक्याच्या पठारभागातील आंबीदुमाला (Ambidumala) येथील झोपडीत ठेवलेल्या बॅगेतून एक लाख रुपये रोख व चाळीस हजार रुपयांचे चार मोबाईल (Mobile) असा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लांबवला आहे. सदर घटना रविवार दि. 8 मे रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत घारगाव (Ghargav) पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, की आंबीदुमाला येथील बाळू भाऊ नरवडे यांच्या शेतातील नवीन विहिरीच्या कामाजवळ असलेल्या ताडपत्रीच्या झोपडीतील स्टीलच्या पेटीत बॅग ठेवलेली होती. या बॅगेतील एक लाख रुपये आणि चाळीस हजार रुपयांचे चार मोबाईल (Mobile) असा एकूण 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लांबवला आहे.

याप्रकरणी सुभाष गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. अधिक तपास पोहेकॉ. एकनाथ खाडे हे करत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पठारभागात केबल चोर्‍या सुरू आहेत. यामुळे आधीच शेतकरी भयभीत असताना पुन्हा अशी घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या