Wednesday, June 19, 2024
Homeनगरपैसे मागितल्याने ठेकेदाराला मारहाण; माजी नगरसेवकासह चौघांविरूध्द गुन्हा दाखल

पैसे मागितल्याने ठेकेदाराला मारहाण; माजी नगरसेवकासह चौघांविरूध्द गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

उसणे दिलेले पैसे चार लोकांत मागितल्याच्या रागातून शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख माजी नगरसेवक सचिन जाधव व इतरांनी ठेकेदाराला मारहाण केली. चेतन शशीकांत अग्रवाल (वय 31 रा. बुरूडगाव रस्ता, नगर) असे मारहाण झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. मंगलगेट परिसरात सचिन जाधव यांच्या कार्यालयात ही घटना घडली आहे.

मारहाणीत जखमी झालेल्या चेतन यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून सचिन जाधवसह चौघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 14) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन तुकाराम जाधव (रा. रामचंद्र खुंट), प्रेम काळे, प्रशांत काळे, अभिजित तांबडे (पूर्ण नाव, पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. चेतन यांनी सुमारे 15 ते 20 दिवसांपूर्वी सचिनला वाळवणे गावातील यात्रेच्या दिवशी उसणे पैसे दिले होते.

ते पैसे मागण्यासाठी चेतन हे सचिनच्या मंगलगेट येथील कार्यालयात 12 मे रोजी दुपारी गेले होते. चेतन यांनी पैशाची मागणी केली असता सचिनने शिवीगाळ करून चार लोकांत पैसे मागतो का? असे म्हणून मारहाण केली. धारदार वस्तूने डोक्यात मारून जिवे मारण्याची धमकी दिली. प्रेम, प्रशांत व अभिजित यांनी देखील मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या