Wednesday, May 6, 2026
Homeक्राईमCrime News : पैशांच्या वादातून दोन गटांत हाणामारी, दोघे जखमी

Crime News : पैशांच्या वादातून दोन गटांत हाणामारी, दोघे जखमी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तालुक्यातील गुंडेगाव शिवारात दोन गटांत हाणामारीची घटना घडली असून यामध्ये दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी (20 मार्च) दुपारी 12 वाजताच्या सुमारास गुंडेगाव बसस्टँड परिसरात पैशांच्या उधारीच्या वादातून मारहाण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सुरेश फाकट्या चव्हाण (वय 60, रा. गुंडेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश सिध्दीकर चव्हाण, संगिता सिध्दीकर चव्हाण व सिध्दीकर फाकट्या चव्हाण (सर्व रा. गुंडेगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून संशयित आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच एकाने लाकडी दांडक्याने डोक्यात मारून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी स्वत: जखमी झाले आहेत. गुरूवारी (19 मार्च) रात्री गुंडेगावातील ससा टेकडी परिसरात घरासमोर उभ्या असलेल्या विनोद सिध्दीकर चव्हाण (वय 26) यांच्यावर चौघांनी मिळून हल्ला केल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी सय्यदलाल फाकट्या चव्हाण, सुरेश फाकट्या चव्हाण, निलेश सय्यदलाल चव्हाण व अश्विनी नीलेश चव्हाण (सर्व रा. गुंडेगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, संशयित आरोपींनी काठी व दगडांनी मारहाण करत त्यांना जमिनीवर पाडले, तसेच डोळ्यात मिरची पूड टाकून जखमी केले. पोलीस तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

पंचवटीतील श्री काळाराम मंदिरावर फडकला धर्मध्वज

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७-२८ च्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात आज धर्मध्वज उभारणी सोहळा पार पडला. अयोध्येच्या धर्तीवर उभारलेल्या...