Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमपैशाच्या वादात मध्यस्थी केल्याने तरूणावर कोयत्याने वार

पैशाच्या वादात मध्यस्थी केल्याने तरूणावर कोयत्याने वार

नालेगाव परिसरातील घटना || पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

आमच्या पैशाच्या वादात तू मध्यस्थी करू नकोस. असे म्हणून शिवीगाळ करून तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना नालेगाव परिसरातील वारुळाचा मारुती जवळ घडली. याबाबतची माहिती अशी, अरुण रखमाजी कदम (वय 39, रा. वारुळाचा मारुती जवळ, नालेगाव) हे त्यांच्या घराजवळ असताना गणेश उर्फ बजरंग बाबाजी चितळे हा त्यांच्याकडे, विशाल कदम याने मला मारले असे ओरडत पळत आला. तेव्हा अरुण कदम हे गणेश चितळे यास घेऊन विशाल कदमकडे गेले. तुम्ही गणेश चितळेसोबत का भांडता? असे विचारले असता विशाल कदम याने आमच्यात पैशाचा वाद आहे. तू मध्ये पडू नकोस असे बोलला.

- Advertisement -

त्यावेळेस अरुण कदम यांनी विशाल कदम व गणेश चितळे यांच्यासोबत असलेल्या पैशाच्या वादाबाबत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. याचा राग येऊन विशाल कदम याने त्याच्या दोन साथीदारांना फोन करून बोलावून घेतले. त्या वेळेस ते दोघे तेथे मोटरसायकलवरून आले. त्या दोन अनोळखी साथीदारांनी येऊन शिवीगाळ, दमदाटी करीत कोण विशाल कदमला नडतो? असे म्हणत त्यातील एकाने गाडीच्या डिक्कीतून कोयता काढून अरुण कदम यांच्या खांद्यावर व उजव्या हातावर वार केले. त्यामुळे त्यांच्या खांद्यातून रक्त येऊ लागले. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेले दोघे तिथून पळून गेले. त्यावेळी विशाल कदमही तेथून निघून गेला. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी अरुण कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल कदम व त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...