Tuesday, May 26, 2026
Homeदेश विदेशMonsoon 2026 : मान्सून आज केरळात धडकणार; विनाअडथळा ६ जूनला कोकणात पोहोचणार

Monsoon 2026 : मान्सून आज केरळात धडकणार; विनाअडथळा ६ जूनला कोकणात पोहोचणार

मुंबई । Mumbai

देशभरात उन्हाचा कडाका शिगेला पोहोचला असतानाच हवामान खात्याने मान्सूनबाबत एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी दिली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अनुकूल स्थितीमुळे यंदा नैऋत्य मोसमी वारे आपल्या ठरलेल्या वेळेआधीच म्हणजेच आज २६ मे रोजी केरळमध्ये धडकणार आहेत. केरळनंतर हा मान्सून वेगाने पुढे सरकणार असून महाराष्ट्रात वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

यंदा नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून आपल्या ठरलेल्या वेळेपेक्षा लवकर भारतीय मुख्य भूभागावर धडकणार आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मान्सूनचा वेग कमालीचा वाढला असून तो अतिशय वेगाने पुढे सरकत आहे. दरवर्षी १ जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यंदा वेळेआधीच म्हणजेच २६ मे च्या सुमारास केरळच्या किनारपट्टीवर धडकत आहे. मान्सून सध्या अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, कोमोरिन क्षेत्र आणि अंदमान समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये वेगाने वाटचाल करत आहे.

पुढील २ ते ३ दिवसांत तो या भागांत पूर्णपणे स्थिरावेल. मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर काल २५ मे रोजी केरळमधील पाथनमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, इडुक्की, एर्नाकुलम, त्रिशूर, मलप्पुरम, कोझिकोड आणि वायनाड या ९ जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर २६ आणि २७ मे रोजी तिरुवनंतपुरम, कोल्लम, अलाप्पुझा आणि एर्नाकुलमसाठी सुद्धा इशारा देण्यात आला आहे.

हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणत्याही प्रकारच्या चक्रीवादळाची निर्मिती झालेली नाही. वादळ नसल्यामुळे मान्सूनचा प्रवाह खंडित होणार नाही आणि तो कोणत्याही अडथळ्याविना अत्यंत सुरळीतपणे आणि वेगाने भारताच्या इतर राज्यांकडे मार्गक्रमण करेल. सध्या राज्यातील काही भागांत मान्सूनपूर्व सरी कोसळत असल्या तरी विदर्भासारख्या भागात अजूनही पाऊस न झाल्याने तेथील नागरिकांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागत आहे.

केरळमध्ये पाऊल ठेवल्यानंतर मोसमी वारे कर्नाटक आणि आंध्र प्रदेश पार करत महाराष्ट्राच्या दिशेने प्रवास करतात. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मान्सूनचा हा प्रवास असाच सुसाट राहिल्यास ५ जून रोजी गोव्यात मान्सूनचे आगमन अपेक्षित आहे. त्यानंतर ६ जून रोजी महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर मान्सून धडक देईल. पुढच्या दिवशी ७ जूनला पुणे आणि परिसरामध्ये मान्सूनचं आगमन होऊ शकतं आणि १० जूनपर्यंत महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत १० मान्सून अधिकृतपणे सक्रिय होण्याचा अंदाज आहे.

ताज्या बातम्या

कांदा

Onion Issue: कांदा प्रश्न पेटला; चांदवडला कांदा उत्पादकांचा महामोर्चा, नेमक्या मागण्या...

0
चांदवड | प्रतिनिधीराज्यात पुन्हा एकदा कांदा प्रश्न पेटला असून कांद्याला योग्य हमी भाव मिळावा यासाठी नाशिकमधील चांदवड तालुक्यात कांदा उत्पादक आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून...