नाशिक Nashik
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने, त्याचा थेट परिणाम महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर होत आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या सर्व भागात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाने महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात पुढील पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः कोकण, विदर्भ व खान्देशसह नाशिक जिल्ह्यात व सह्याद्री घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या जिल्ह्यांमध्ये अधिक पावसाची शक्यता
हवामान विभागाने विशेषतः मुंबई, मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच नाशिक धुळे नंदुरबार जळगांव उत्तर छ. सं. नगर अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया ह्या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव अधिक जाणवू शकतो.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




