Sunday, October 13, 2024
Homeमुख्य बातम्याआजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे.त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते. विरोधकांच्या मागणीवरून केंद्र सरकारने अधिवेशनादरम्यान मणिपूर हिंसाचारावर चर्चा करण्याचे मान्य केले.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

तत्पूर्वी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यवसाय सल्लागार समितीची बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, सरकार प्रत्येक मुद्द्यावर नियमानुसार आणि सभापतींच्या परवानगीनंतर चर्चा करण्यास तयार आहे.या अधिवेशनासाठी 32 मुद्दे आहेत.अधिवेशनात दिल्ली अध्यादेशासह 21 नवीन विधेयके मांडली जाऊ शकतात. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी यापूर्वी 18 जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, परंतु एनडीए आणि विरोधी पक्षांच्या बैठकीमुळे ती स्थगित करावी लागली.

दरम्यान,काँग्रेसचे मीडिया प्रभारी जयराम रमेश म्हणाले , मोदी सरकारने मणिपूर हिंसाचार आणि महागाईवर संसदेत चर्चा करावी. सरकारला जुनी वृत्ती बदलावी लागेल. आत्तापर्यंत ते ‘माझे ऐका, नसता चालते व्हा’ अशी भूमिका घेत आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या