Tuesday, April 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMonsoon Update : यंदा देशात किती टक्के पाऊस पडणार? IMD चा पहिला अंदाज...

Monsoon Update : यंदा देशात किती टक्के पाऊस पडणार? IMD चा पहिला अंदाज जाहीर

मुंबई | Mumbai

सध्या राज्यावर अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) संकट घोंघावत असून, काही ठिकाणी उष्णतेच्या तीव्र लाटा जाणवत आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांत तापमान ४० अंशाच्या पुढे गेल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाल्याचे दिसत आहे. अशातच आता कडक उन्हाच्या लाटेने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी (Farmer) आयएमडी आणि काही खाजगी संस्थांनी दिलासादायक बातमी दिली आहे.

- Advertisement -

भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) आणि खाजगी संस्था स्कायमेटने (Skymet) २०२५ च्या मान्सून (Monsoon) हंगामासाठी आपला पहिला अंदाज जाहीर केला आहे. या दोन्ही अंदाजानुसार देशात यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात भारतीय हवामान खात्याने देशात सरासरीच्या १०५ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर यंदा मान्सूनवर अल निनोचा धोका (AL Nino Effect On Indian Monsoon) नसल्याने देशात चांगला पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

तसेच हा मान्सूनचा पहिला अंदाज असून, पावसाळ्याच्या तोंडावर आणखी एक अंदाज व्यक्त केला जाण्याची शक्यता आहे. तर यंदाच्या चांगल्या पावसामागे ‘ला निना’ (La Niña) परिस्थिती कारणीभूत ठरणार आहे. मान्सूनवर विपरीत परिणाम करणारा ‘अल निनो’ (El Niño) प्रभाव आता कमी होत असून, मान्सूनच्या आगमनापर्यंत तो पूर्णपणे नाहीसा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ला निनाच्या अनुकूल स्थितीमुळे चांगला पाऊस पडेल, असे आयएमडीने सांगितले आहे.

स्कायमेटचा अंदाज काय?

भारतीय हवामान विभागासोबतच खाजगी हवामान संस्था असणाऱ्या स्कायमेटने (Skymet) देखील २०२५ चा नैऋत्य मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर दरम्यान देशभरात सरासरी ८६८.६ मिमी पाऊस पडेल. जरी टक्केवारीत किंचित फरक असला तरी, दोन्ही संस्थांच्या मते पाऊस समाधानकारक असेल, असे सांगण्यात आले आहे. तसेच जूनमध्ये केरळ (Kerala), कर्नाटक (Karnataka), कोकण (Konkan) आणि गोव्यात (Goa) सरासरीपेक्षा जास्त, तर मध्य भारतात सामान्य पाऊस असेल. मात्र, उत्तर भारतात मान्सून उशिरा पोहोचेल आणि एकूण जून महिन्याचा पाऊस सरासरीच्या ९६% राहू शकतो. जुलै (१०२%), ऑगस्ट (१०८%) आणि सप्टेंबर (१०४%) मध्ये मात्र सरासरी किंवा त्याहून अधिक पावसाचा अंदाज आहे, असेही स्कायमेटने म्हटले आहे.

अशी काढली जाते पावसाची टक्केवारी

  • ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस – अपुरा पाऊस
  • ९० ते ९५ टक्के – सरासरीपेक्षा कमी पाऊस
  • ९६ ते १०४ टक्के – सरासरी इतका पाऊस
  • १०५ ते ११० टक्के – सरासरीपेक्षा जास्त पाऊस
  • १०० टक्क्यांपेक्षा जास्त – सर्वाधिक पाऊस
YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; शिंदेंच्या विभागाच्या...

0
मुंबई | Mumbai मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ...