पुणे | Pune
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी असून यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा आधी अंदमानात दाखल झाला आहे. मान्सून आज अरबी समुद्रात दाखल झाला आहे. अरबी समुद्रासोबतच मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात मान्सून पुढे सरकला आहे. २७ मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर ५ जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. १५ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असे देखील हवामान खात्याने सांगितले.
हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी मान्सूनबाबत महत्वाचे अपडेट दिले आहेत. होसाळीकर यांनी केलेल्या ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की, ‘अंदमानमध्ये दाखल झालेला मान्सून आज अरबी समुद्रात पोहचला आहे. मान्सून हळूहळू पुढे सरकरत आहे. मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात मान्सून पुढे सरकता दिसत आहे.’ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील ४ ते ५ दिवसांत मध्यम ते तीव्र गडगडाटासह जोरदार वारे आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1922937292752072794
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह (40-50 किमी प्रतितास वेग) हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह (50-60 किमी प्रतितास वेग), मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने वर्तवल्यानुसार, मान्सून १ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर त्याची पुढची वाटचाल सुरू होईल. ५ जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ५ जूनला मान्सून कोकणात दाखल झाल्यानंतर हळूहळू तो १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल. दरम्यान, सध्या राज्यावर अवकाळी पावसाचे सावट आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे.
पुढील ४ ते ५ दिवसांत मध्यम ते तीव्र गडगडाटासह जोरदार वारे आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेदरम्यान बाहेर पडणे टाळा. झाडांना आश्रय म्हणून घेऊ नका. सुरक्षिततेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
15 May, पुढील ४-५ दिवसांत मध्यम ते तीव्र गडगडाटासह जोरदार वारे आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
🔴 मेघगर्जने दरम्यान बाहेर पडणे टाळा. झाडांना आश्रय म्हणून घेऊ नका.❌🌳
🧡 सुरक्षिततेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा. pic.twitter.com/sc3ZJ3LhOH— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 15, 2025
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा