Saturday, May 25, 2024
HomeUncategorizedराज्यातील बहुतांश जिल्ह्यांना उद्या ‘येलो अलर्ट’

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना उद्या ‘येलो अलर्ट’

औरंगाबाद – Aurangabad

महाराष्ट्रातील (Maharashtra) बहुतांश जिल्ह्यांमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होत आहे. बंगालच्या (Bengal) उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात विदर्भासह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून बहुतांश जिल्ह्यांना येलो अ‌लर्ट देण्यात आला आहे.

- Advertisement -

‘या’ जिल्ह्यांना येलो अ‌लर्ट

सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली (Solapur, Sangli, Osmanabad, Beed, Latur, Parbhani, Nanded, Hingoli) जिल्ह्यांना येलो अ‌लर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागानं 17 ऑगस्टला राज्याच्या विविध भागात पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. औरंगाबाद, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

18 ऑगस्टला कोकण ते विदर्भात पाऊस

औरंगाबाद, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, रायगड, बीड, उस्मानाबाद, जालना, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्याला येलो अ‌लर्ट देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या