सार्वमत
पुणे (प्रतिनिधी) – मान्सून नेहमीच्या तुलनेत चार दिवस अगोदर दक्षिण अंदमानात दाखल झाला आहे. मात्र, दक्षिण बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अम्फान चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मान्सून कमजोर होणार आहे. कमजोर झाला तरीही उत्तर भारतात असलेला 1001 हेप्टा पास्कल हवेचा दाब आणि दक्षिण भारताच्या हिंदी महासागरावर असलेला 1010 हेप्टा पास्कल हवेचा दाब यामुळे मान्सून वेगाने पुढे जाईल व केरळात वेळेवर म्हणजे एक जूनला त्याचे आगमन होईल तर महाराष्ट्रात सात जूनला त्याचे आगमन होईल असा अंदाज कृषी हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.
दक्षिण बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अम्फान हे चक्रीवादळाचा प्रभाव हा मान्सूनच्या तीव्रतेवर होणार आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव साधारण चार दिवस राहणार असून हे चक्रीवादळ मोठ्या प्रमाणात बाष्प ओढून घेणार असल्याने मान्सून काहीसा कमजोर होणार आहे. मान्सून दर वर्षी दक्षिण अंदमानला 20 मे रोजी दाखल होतो. मात्र यंदा तो चार दिवस अगोदर म्हणजेच 16 तारखेला दाखल झाला आहे. माञ अम्फान चक्रीवादळनं मोठ्या प्रमाणात बाष्प ओढून घेतलं जाणार आहे.
चक्रीवादळाने मोठ्याप्रमाणात ढग विखुरले जाणार आहे. त्यामुळे ढग जातील तिथपर्यंत पाऊस पडेल. चक्रीवादळ बाष्प घेऊन गेल्यानं मान्सून थोडा कमजोर होईल्. मात्र, उत्तर भारतात असलेला 1001 हेप्टा पास्कल हवेचा दाब आणि दक्षिण भारताच्या हिंदी महासागरावर असलेला 1010 हेप्टा पास्कल हवेचा दाब यामुळे मान्सून वेगाने पुढे जाईल व केरळात वेळेवर म्हणजे एक जूनला त्याचे आगमन होईल तर महाराष्ट्रात सात जूनला त्याचे आगमन होईल असे कृषी हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले. दरम्यान, पुर्व किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पाऊस होईल. ओरिसासह महाराष्ट्राच्या पूर्व भागातही पाऊस पडणार आहे. नांदेड, पूर्व विदर्भ, गडचिरोली, गोंदियासह काही ठिकाणी पाऊस पडेल असे डॉ. साबळे यांनी सांगीतले.