Saturday, June 15, 2024
Homeमुख्य बातम्याचंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान 50 अंश सेल्सिअस

चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान 50 अंश सेल्सिअस

बंगळुरू । वृत्तसंस्था Bangalore

- Advertisement -

भारताच्या ‘चांद्रयान-3’ने चंद्रावर यशस्वी हळूवार उतरण्यास पाच दिवस उलटले आहेत. चंद्रावर उतरल्यानंतर विक्रम लँडर आणि रोव्हर प्रज्ञान कार्यरत झाले आहेत. चंद्राविषयी माहिती आणि छायाचित्रे देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. विक्रमच्या चाएसटीई पेलोडने चंद्राच्या तापमानाविषयी प्राथमिक माहिती पाठवली आहे. त्या माहितीनुसार चंद्राच्या पृष्ठभागावरील तापमान 50 अंश सेल्सिअस इतके असल्याचा प्राथमिक अंदाज ‘इस्त्रो’कडून वर्तवण्यात आला आहे.

विक्रम लँडरवरील चाएसटीए पेलोडने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाभोवतीच्या मातीचे तापमान मोजले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरची ही पहिली तपासणी आहे. असे करणारा भारत हा पहिला देश आहे. माहितीचा सविस्तर अभ्यास सुरू आहे, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) म्हटले आहे.‘इस्रा’ने शेअर केलेल्या आलेखानुसार चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान अंदाजे 50 अंश सेल्सिअस आहे. खोलवर गेल्यावर तापमान झपाट्याने घसरते. 80 मिमीच्या आत गेल्यानंतर तापमान -10 अंशांपर्यंत खाली येते, असे ‘इस्त्रा’ने ट्विट केलेल्या माहितीत म्हटले आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश आहे. दक्षिण ध्रुवावरील चंद्राचा पृष्ठभाग, पर्वत आणि दर्‍यांमुळे अतिशय गुंतागुंतीचा आहे. तसेच मोजणीतील थोडीशी चूकसुद्धा लँडर मोहीम अयशस्वी होऊ शकते, असे ‘इस्त्रो’ इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

अमेरिका, ब्रिटनची मदत

प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावरून छायाचित्रे काढत आहे. ती छायाचित्रे ‘इस्रो’च्या स्थानकांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागेल, असे इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले. अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासारख्या इतर देशांच्या ग्राउंड स्टेशनची मदत घेतली जात आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर वातावरण नसल्याने सर्व सावल्या गडद दिसत आहेत. त्यामुळे स्पष्ट छायाचित्रे मिळणे कठीण होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या