नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
गेल्या काही दिवसांपासून देशातील करोना रुग्णांच्या (Corona Patients) संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत १ लाख ४० हजारांहून अधिक नवीन करोना रुग्ण नोंदवले गेले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी एक लाखांहून अधिक करोनाबाधितांची (Corona Positive) वाढ भारतात (India) झाली आहे…
काल १ लाख ४१ हजार ५२५ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले. याआधी १ लाख १७ हजार रुग्णांची नोंद झाली. नवीन रुग्णांच्या वाढीच्या तुलनेत मृतांची संख्या खूपच कमी आहे, ही दिलासादायक बाब आहे. शुक्रवारी, देशभरात २८५ लोकांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक ४० हजार ९२५ नवीन रुग्ण आढळले. नवीन रुग्णांची संख्या आता करोनाच्या दुसर्या लाटेच्या (Corona Second Wave) पिकवर पोहोचली आहे. मुंबईत (Mumbai) एकाच दिवसात २० हजार ९७१ नवे रुग्ण आढळले.
पश्चिम बंगाल (West Bengal) नवीन प्रकरणांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये १८ हजार २१३ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर दिल्लीत (Delhi) १७ हजार ३३५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.