Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजवणीत 100 कोटींपेक्षा जास्त कामे झिरवाळांनी केली : कड

वणीत 100 कोटींपेक्षा जास्त कामे झिरवाळांनी केली : कड

इच्छुक उमेदवार भरसट यांचा ना. झिरवाळ यांना पाठिंबा जाहीर

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यातील वणी जिल्हा परिषद गटात 100 कोटींपेक्षा जास्त विकासनिधी आणुन नामदार नरहरी झिरवाळ यांनी इतिहास रचला आहे. वणी शहराला जोडणार्‍या प्रत्येक रस्त्याला ना. झिरवाळ यांनी निधी दिला आहे. विकासाचा हा रथ पुढे न्यायचा असेल तर आपल्या सर्वांना एकत्र होऊन या विकासपुरुषाच्या मागे खंबीर उभे राहुन पुन्हा एकदा घड्याळाला मताधिक्य मिळवुन द्यावे लागणार आहे, असे प्रतिपादन वणीचे माजी जिल्हा परिषद सदस्य विलास कड यांनी केले.

यावेळी इच्छुक उमेदवार तथा वणीचे सरपंच मधुकर भरसठ यांनी ना. झिरवाळ यांना पाठिंबा जाहीर केला व त्यांच्या व्यासपीठावरही विराजमान झाले.वणी येथे ना.नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारार्थ प्रमुख पदाधिकार्‍याची बैठक झाली. त्याप्रसंगी विलास कड बोलत होेते. अध्यक्षस्थानी वणीचे सरपंच मधुकर भरसठ होते. विलास कड पुढे म्हणाले नरहरी झिरवाळ आणि वणी शहर हे घट्ट नाते बनले आहे. आतापर्यत ना. झिरवाळ यांनी अनेकांना वेगवेगळी मदत केली आहे. वणी परिसरात एकही गाव नाही की जेथे झिरवाळ यांनी निधी दिला नाही.वैद्यकीय सेवेबाबत तर नरहरी झिरवाळ यांनी प्रचंड सहकार्य गोरगरिबांना केलेले आहे. त्यामुळे हेच आशीर्वाद जनता नरहरी झिरवाळ यांना मतदान करुन देतील असेही कड म्हणाले. नरहरी झिरवाळ हे आगामी काळात मंत्री होतील, त्यामुळे आपल्याला विकासासासाठी झिरवाळ यांनाच मतदान करावे असे कड म्हणाले. नरहरी झिरवाळ यांना मोठया मताधिक्याने निवडून आणुन विकासाची दिवाळी साजरी करु असे प्रतिपादन जेष्ठ नेते मनोज शर्मा यांनी केले.

यावेळी वणी परिसरातील मोठया संख्येने अनेक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी ‘नरहरी झिरवाळ आगे बढो हम तुम्हारे साथ है ’ आदी घोषणा दिल्या. अंध अपंग संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मोरे यांनीही झिरवाळ यांना पाठिबा जाहिर केला. सर्व गोरगरीब अपंग बांधवांचे आशिर्वाद झिरवाळ यांच्याबरोबर रहातील असे मोरे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रीय सेवक संघाचे सुरेश वर्मा, वसंत कावळे, जे. डी. केदार, सदुभाऊ शेळके, अशोकमामा भालेराव, वसंतराव भोये, विश्वासराव देशमुख, जगन वाघ आदींनी झिरवाळ यांच्या कामाची प्रशंसा केली व सर्वांनी घडयाळाला मतदान करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सभेत पुर्ण घड्याळमय वातावरण झाले होते.

यावेळी गणेश देशमुख, ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील, केशवराव भोये, नितीन मेधणे, रघुनाथ पाटील, नानासाहेब सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी एकनाथ गायकवाड, बाळासाहेब जाधव, प्रकाश वडजे, विष्णू पाटील, बबनराव जाधव, राहुल गांगुर्डे, जगन वाघ, नामदेव गवळी, उत्तम राऊत, संतोष पाडवी, कैलास धुम, बंटी बागूल, धनाजी गायकवाड, कृष्णा मातेरे, मनोज शर्मा, महेंद्र बोरा, महेंद्र पारख, रोशन समदडीया, रामभाऊ ढगे, गोटीराम वाळके, रमेश भालेराव, विजय पाटील, राजेंद्र ्थोरात, दुर्गेश चितोडे, संजय गोतरणे, रामदास घडवजे, सुरेश कोंड, रंगनाथ बर्डे, जहीर शेख, बाळासाहेब समदडीया, लक्ष्मण कव्टे,अतूल निगळ, नितीन भालेराव, विशाल कड, भास्करराव फुगट, पंडीत बागूल, सम्राट राऊत, दत्तू राऊत आदी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मी आजही निष्ठावानच
काही विरोधक मला गद्दार म्हणत असतील. पण मी गद्दार नाही. मी पूर्वीही घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवली आहे. आजही घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवत आहे. मी पहाटे सध्दा ना. अजित पवार यांच्या बरोबर गेलो होतो. त्यानंतर एकदा गडबड झाली तेव्हाही मी दादासोबत होतो. आजही दादांसोबतच आहे. जनतेचे आपल्यावर प्रेम असल्याने जनता सुध्दा आपल्याबरोबरच राहिल.
ना. नरहरी झिरवाळ, उमेदवार महायुती

ना. झिरवाळांची भूमिका योग्य
महाराष्ट्राचे उपमुूख्यमंत्री अजितदादा पवार यांना साथ देण्याची झिरवाळ यांची भूमिका योग्य आहे. ना. झिरवाळ यांनी तुतारी हातात घेतली असती तर तालुक्याचा विकास खुंटला असता. जपान सारख्या देशातही ना. झरवाळ यांची टोपी प्रसिध्द आहे. तालूक्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्व जनतेला बरोबर घेऊन काम करणार्‍या ना. नरहरी झिरवाळ यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा.
जे.डी.पवार, जेष्ठ नेते

महायुतीला निवडून आणू : तिवारी
दिंडोरी तालुक्यात भारतीय जनता पक्ष महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल व ना. झिरवाळ यांना प्रचंड मतांनी निवडुन आणेल असे प्रतिपादन भाजपाचे वणी मंडल अध्यक्ष किरण तिवारी यांनी केले. वणी येथे झालेल्या महायुती व कार्यकर्ते बैठकित किरण तिवारी यांनी झिरवाळ यांचे कौतुक केले. यावेळी किरण तिवारी यांनी पेसा विषयावर भाष्य केले. ते म्हणाले की पेसा हा राज्यपाल व राष्ट्रपती यांच्या अखत्यारीतला विषय आहे.यास भाजपाचा कुठलाही विरोध नाही.विरोधकांना त्यांचा पराभव आजच दिसायला लागल्याने ते भाजप हा आदिवासी विरोधात असल्याचा प्रचार करीत आहे. पण कोणत्ंयाही परिस्थितीत जनतेने विरोधकांच्या भूलथांपाना बळी पडु नये. भाजप हा दिन दलित आदिवासी जनतेच्या विकासासाठी झटणारा पक्ष आहे. भविष्याच्या विकासाच्या दृष्टीने व भारतला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर महायुती सरकारचीच गरज असल्याचे किरण तिवारी यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या