दिल्ली | Delhi
उत्तर आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये 6.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाने हाहाकार माजवला आहे. या अपत्तीत जवळपास 296 हून आधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भूकंपाची तीव्रता लक्षात घेता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
याठिकाणी प्रशासनातर्फे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केलं असून ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. भारतीय वेळानुसार आज पाहटे उत्तर आफ्रिकेतील देश मोरोक्कोमध्ये भूकंपानं मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवला आहे. या भूकंपानंतर अनेक इमारती कोसळल्या. यामुळे 296 हून आधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अद्यापही बचाव कार्य सुरु असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दु:ख झाले आहे. या दुःखद क्षणांमध्ये माझ्या प्रार्थना मोरोक्कोच्या लोकांसोबत आहेत. ज्या नागरिकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत. या कठीण काळात मोरोक्कोला शक्य ती सर्व मदत देण्यासाठी भारत तत्पर आहे, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पोस्ट करण्यात आलं आहे