Friday, May 31, 2024
Homeनगरलुटमार टोळीच्या मोरक्याला अटक, LCB ची कामगिरी

लुटमार टोळीच्या मोरक्याला अटक, LCB ची कामगिरी

अहमदनगर (प्रतिनिधी)

महामार्गावर वाहन चालकांना लुटणार्‍या टोळीच्या मोरक्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB Ahmednagar) पोलिसांनी (Police) रांजणगाव गणपती (ता. शिरूर जि. पुणे) (Ranjangoan Ganpati) येथे अटक केली. सागर आण्णासाहेब भांड (वय 25 रा. ढवण वस्ती, सावेडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी एलसीबीने (Ahmednagar LCB) त्याच्या पाच साथीदारांना अटक केली आहे.

- Advertisement -

गेल्या दोन महिन्यापासून भांड टोळीने नगर- पुणे (Ahmednagar-Pune), सुपा शिवार (Supa), नगर-मनमाड (Nagar-Manmad) व संगमनेर-लोणी महामार्गावर ()Sangamner-Loni highway सात ठिकाणी वाहन चालकांना लुटले आहे. हे सर्व गुन्हे उघडकीस आले आहे. 4 ऑगस्ट रोजी दिलीप देवराम तमनर यांना नगर-मनमाड रोडवर लुटले होते. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Sation) जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील पाच आरोपींना एलसीबीने यापूर्वी अटक करून राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

मात्र, त्यांचा मोरक्या आरोपी भांड पसार होता. तो रांजणगाव गणपती येथे भाड्याने रूम घेवून राहत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी एक पथक रांजणगाव येथे पाठविले. त्या पथकाने भांड याला अटक केली. भांड विरोधात एकुण 27 गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या