Thursday, May 23, 2024
Homeनगरआईसह पत्नीवर कोयत्याने वार करून आत्महत्येचा प्रयत्न

आईसह पत्नीवर कोयत्याने वार करून आत्महत्येचा प्रयत्न

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

तालुक्यातील चोभेवाडी येथे आई व पत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले. तसेच स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. आईच्या फिर्यादिवरून आरोपी मूलगा रामचंद्र दशरथ रोडे (रा.चोभेवाडी, ता. जामखेड) याच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्नासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (दि.6) रात्री 1 वाजच्या सुमारास संशयित रामचंद्र दशरथ रोडे याने आई अलकाबाई दशरथ रोडे (65) व त्याची पत्नी उषाताई रामचंद्र रोडे या दोघींना मारहाण केली. यामध्ये त्याने ऊस तोडण्याच्या कोयत्याने आईच्या दोन्ही पायाचे घोट्यावर व डावे हाताचे कोपरावर, तसेच पत्नीच्या तोंडावर गळ्यावर, डोक्यावर, हातावर ऊस तोडण्याचे कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपीना घराजवळ असणारे विद्यूत रोहित्रावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये तोही जखमी झाला आहे. त्यांच्यावर जामखेड येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी संशयितावर जामखेड पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्नासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक महेश पाटील, सपोनि सुनिल बडे, पोसई अनिलराव भारती यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुनिल बड़े हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या