Saturday, May 4, 2024
Homeनगरआईच्या प्रियकराचा मुलानेच काढला काटा

आईच्या प्रियकराचा मुलानेच काढला काटा

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

आईचे परपुरूषाशी असलेले अनैतिक संबंध (The mother’s immoral relationship with a stranger) सहन न झाल्याने मुलाने प्रियकराचा काटा काढला. त्याने आईच्या प्रियकराचा (Mother’s lover) त्याच्या राहत्या घरीच गळा दाबून खून (Murder) केला. या घटनेमुळे राहुरी तालुक्यात (Rahuri Taluka) खळबळ उडाली आहे. ही घटना राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द (Kolhar Khurd) येथे दि. 24 जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपीवर राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) खुनाचा गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, नंतर प्रियकराचा ह्दयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाल्याचा बनाव करून अंत्यविधी करण्याची तयारी करण्यात आली. मात्र, शवविच्छेदनानंतर खरा प्रकार समोर आला असून राहुरी पोलिसात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

या घटनेतील आरोपीच्या आईचे मयत चांगदेव शंकर टिळेकर यांच्या सोबत अनैतिक संबंध असल्याची चर्चा होती. ही गोष्ट मुलाला कायमच खटकत होती. दि. 24 जुलै रोजी रात्री आठ वाजे दरम्यान आरोपीने त्याच्या आईचा प्रियकर चांगदेव टिळेकर यांचा गळा दाबून खुन केला. घटनेनंतर त्याने नातेवाईकांना फोन करून सांगितले, चांगदेव टिळेकर यांना ह्दयविकाराचा झटका येऊन ते मयत झाले आहेत. असे सांगून तो अंत्यविधीची घाई करत होता. चांगदेव यांच्या मुलीला संशय आल्याने तिने मयत चांगदेव टिळेकर यांचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. लोणी येथे झालेल्या शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर चांगदेव टिळेकर यांचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे समोर आले.

राहुरी पोलीस ठाण्यात मयताच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेनंतर आरोपीला ताबडतोब अटक करून गजाआड करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ (PI Nandkumar Dudhal) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक निरज बोकील (Deputy Inspector of Police Niraj Bokil) हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या