Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Winter Session: विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान करणाऱ्या सुर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंग; रोहित पवार,...

Maharashtra Winter Session: विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान करणाऱ्या सुर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंग; रोहित पवार, सुषमा अंधारेंविरोधातही होणार कारवाई?

नागपूर | Nagpur
नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारादरम्यान विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे तसेच सर्व सदस्यांसंदर्भात अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या सूर्यकांत मोरेविरोधात मंगळवारी हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याविरोधात सूर्यकांत मोरे यांनी जाहीर सभेत अपमानजनक वक्तव्य केले. त्यांनी विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचाही जाहीर अपमान केला. यासंदर्भात प्रवीण दरेकर यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे सूर्यकांत मोरे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी विधानसभेचे सदस्य रोहित पवार, लोकसभा सदस्य निलेश लंके आणि शिवसेना (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे मंचावर उपस्थित होत्या. यापैकी कोणीही सूर्यकांत मोरे यांना वरिष्ठ सभागृहाबद्दल आणि सभापतींबद्दल अपमानजनक वक्तव्य केलेतरी रोखले नाही, त्यामुळे हा हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. विधानपरिषदेत आ.प्रवीण दरेकर व आ.श्रीकांत भारतीय यांनी हा प्रस्ताव मांडला.

- Advertisement -

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारादरम्यान २३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) नेते रोहीत पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेदरम्यान पक्षाचे पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांनी विधानपरिषदेचे एकूण कामकाज, तेथील रचना, सदस्य यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केले होते. तसेच सभापतींबाबतदेखील आक्षेपार्ह वक्तव्य करत ते कायदेपंडित आहेत का असा सवाल केला होता.

YouTube video player

कार्पेटचा लाल रंग दुष्काळाचे प्रतिक
विधानपरिषदेतील कार्पेटचा लाल रंग हा दुष्काळाचे प्रतिक आहे व आमदारांच्या लाल बिल्ल्याला कुणी विचारत नाही असेदेखील मोरेने म्हटले होते. याबाबत आ.दरेकर व आ.भारतीय यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला. विधानपरिषदेला मोठी गौरवशाली परंपरा लाभली आहे. याचा संदर्भ समजावून सांगताना दरेकर म्हणाले की, विधिमंडळाच्या रचनेचा त्यांनी उल्लेख केला. विधानसभेमध्ये हिरव्या रंगाचे कार्पेट आहे. तर विधान परिषदेला लाल रंगाचे कार्पेट आहे. त्यावरुन राम शिंदे यांना तांबड्या रंगाच्या बिल्लेवाल्याला कोणी विचारत नाही. तिथे कोणताही कायदा पास होत नाही, तर फक्त मतदान मोजण्याचे काम त्यांना करावे लागते, असे वक्तव्य सूर्यकांत मोरे यांनी केल्याचे सांगत दरेकरांनी हा वरिष्ठ सभागृहाचा, त्यातील सदस्यांचाही अपमान असल्याचे सांगत मोरेंवर कडक कारवाईची मागणी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली.

तर यांच्यावर ही कारवाई व्हावी
संबंधित प्रचारसभेत रोहीत पवार,उद्धवसेनेच्या सुषमा अंधारेदेखील उपस्थित होते. त्यांच्यावरदेखील कारवाईचा विचार व्हावा असे सदस्यांनी म्हटले. राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) अमोल मिटकरी यांनी आक्रमक पवित्रा घेत मोरेच्या वक्तव्याला मूक संमती देणाऱ्या व हसणाऱ्या मंचावरील नेत्यांवरदेखील कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Online Gaming : धक्कादायक! ऑनलाईन गेमचा नाद अन् तीन सख्या बहिणींची...

0
गाझियाबाद । Ghaziabad उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनातून तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. साहिबाबाद परिसरातील भारत सिटी...