नंदुरबार । nandurbar प्रतिनिधी
मोटरसायकलीचा धक्का (Motorcycle shock) लागल्याच्या कारणावरुन (reason) दोन पोलीसांसह (two policemen) एकास जिवे ठार (Attempted murder) मारण्याचा प्रयत्न करुन गळयातील 1 लाख 28 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरुन नेल्याची घटना नंदुरबार शहरात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.24 मे 2023 रोजी नंदुरबार शहरातील टापु परिसरात ईशान परदेशी याच्या मोटरसायकलीचा धक्का गोविंद यशवंत सामुद्रे यांच्या गाडीला लागल्याच्या कारणावरुन गोविंद यशवंत समुद्रे (रा. लहान माळीवाडा), दिपक शाम ठाकरे (रा. चिंचपाडा भिलाटी), बॉबी उर्फ विश्वजीत संजय बैसाणे (रा.समता कॉलनी), आकाश रविंद्र अहिरे (रा.आंबेडकर चौक), विक्की बैसाणे (रा.गौतमनगर) यांनी ईशान मनोज परदेशी यास जिवे ठार मारण्याच्या उद्येशाने मारहाण करुन दुखापती करुन त्याचे गळयातील 32 ग्रॅम वजनाची 1 लाख 28 हजार रुपये किमतीच्या सोन्याची चैन ओढून घेतली.
तसेच कर्तव्यावरील पोना अमोल जाधव, पोना इसमल पावरा हे शासकिय कर्तव्य बजावीत असतांना त्यांनाही धक्काबुक्की करुन ठोसा मारुन गोविंद सामुद्रे याने याने पावरा यांची कॉलर पकडुन शिवीगाळ केली. यात शासकिय गणवेशाचे शर्टाचे बटन तुटले. सदर धक्का बुक्कीत पावरा यांच्या छातीवर नख लागल्याने छातीवर ओरखडले व पोना अमोल जाधव यांनादेखील धक्काबुक्की केल्याने त्याचे पायास दुखापत झाली.
याबाबत इसमल पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गोविंद सामुद्रे, दीपक ठाकरे, बॉबी उर्फ विश्वजीत बैसाणे, आकाश अहिरे, विक्की बैसाणे यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठण्यात भादंवि कलम 307, 395, 353, 332, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अहिरे करीत आहेत.