Monday, November 18, 2024
Homeनंदुरबारतीन राज्यात मोटार सायकल चोरी करणारी टोळी झाली जेरबंद

तीन राज्यात मोटार सायकल चोरी करणारी टोळी झाली जेरबंद

नंदुरबार । nandurbar प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात व मध्य प्रदेश राज्यातुन (three states) मोटार सायकल चोरी (Motorcycle theft) करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या (gang jailed)ठोकल्या असुन, 3 लाख रुपये किमंतीच्या 8 दुचाकी जप्त करीत 8 गुन्हे उघड करण्यात यश आले आहे.

- Advertisement -

यााबाबत अधिक माहिती अशी कि, दि.19 फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शहादा शहरातील धान्य मार्केट परिसरात दोन संशयीत इमस कागदपत्र नसलेली मोटार सायकल कमी किमतीत विक्री करीत आहे सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सांगितली श्री.खेडकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे 1 पथक तयार करुन संशयीतांना ताब्यात घेवून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ शहादा शहरातील धान्य मार्केट परिसरात जावून मिळालेल्या बातमीमधील दोन संशयीतांचा शोध घेता असता, धान्य मार्केट जवळील लिंबाचे झाडाखाली एका दुचाकी वाहनाजवळ उभे दिसले. पथक त्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहून त्यातील एकाने तेथून पळ काढला, परंतु अक्षय लोटन पावरा रा. उमराणी ता. धडगांव यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या मोटार सायकल बाबत विचारपूस केली असता त्याने सदरची मोटार सायकल त्याचा नातेवाईकाची असून धान्य खरेदी करण्यासाठी त्याच्या नातेवाईकासोबत येथे आलो असल्याचे सांगितले.

वाहनाच्या चेचिस व इंजिन नंबरवरून माहिती घेतली असता त्याबाबत शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याच्या सोबत असलेला व पोलीसांना पाहून पळून गेलेल्या इसमाबाबत विचारपूस केली असता, तो शहादा शहरातील भावसार मढीजवळ राहात असलेला त्याचा मित्र कालु ऊर्फ श्रावण याचे घरी मिळू शकतो असे सांगितले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहादा शहरातील भावसार मढी परिसरात जावून कालु ऊर्फ श्रावण दारसिंग परमार रा. रायखेडा ता. पानसेमल जि. बडवाणी मध्य प्रदेश यास ताब्यात घेतले त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने शहादा येथील 1 व 2 अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने शहादा शहर, मध्य प्रदेश राज्यातील खेतिया व गुजरात राज्यातील अंकलेश्वर येथून मोटार सायकल चोरी करुन आणून शहादा तिखोरा रोडवरील गोमाई नदीतील पुलाखाली काटेरी झुडपात लपवून ठेवलेल्या आहे बाबत सविस्तर माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहादा शहरातील त्याचे दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेवून विचारपूस करुन ताब्यात घेतले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जावून तेथून 3 लाख रुपये किमतीच्या 8 मोटार सायकली ताब्यात घेतल्या आहेत. त्याबाबत शहादा पोलीस ठाण्यात 6, अंकलेश्वर (गुजरात) पोलीस ठाण्यात 1, खेतिया (मध्य प्रदेश) पोलीस ठाण्यात 1 गुन्हे दाखल आहेत.

कालु ऊर्फ श्रावण दारसिंग परमार रा. रायखेडा ता. पानसेमल जि. बडवाणी मध्य प्रदेश व दोन अल्पवयीन यांचेकडून एकुण 3 लाख रुपये किमतीच्या 8 मोटार सायकली हस्तगत करुन 8 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. तसेच त्यांना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी शहादा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार दीपक गोरे, पोलीस नाईक विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, पोलीस अंमलदार विजय ढिवरे, किरण मोरे यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या