शहादा | ता. प्र. Shahada
तालुक्यातील लोणखेडा येथे बाजार करण्यासाठी आलेल्या मजुराच्या मोटरसायकलीला भरधाव वेगातील ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मजूर जागीच ठार झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दि. १५ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मलोणी ते लोणखेडा रोडवर लोणखेडा येथे शिवाजी जाण्या पाडवी (वय 25, मांडवी बु.ता.धडगांव, ह.मु. मलोणी ता . शहादा) हा त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल (क्र. MP 09 CN9594) वर लोणखेडा येथे बाजार करण्यासाठी जात असतांना लोणखेडा गांवाकडुन येणा-या ट्रक (क्र . GJ 06 AZ5988) ने ठोस दिल्याने मयत झाला.
अपघात घडताच ट्रक चालक खबर न देता पळुन गेला. याबाबत शहादा पोलिस ठाण्यात भादवि कलम 304, 337, 338, 427 मोटार वाहन कायदा कलम 184, 134, 187 प्रमाणे ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई विक्रांत कचरे करीत आहेत.